Maharashtra Politics :महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना अन्वये महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांची कर्जमाफी करण्यात आली होती.

त्यावेळी महाविकास आघाडी सरकारने ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जाची परतफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा केली होती.

मात्र तदनंतर संपूर्ण जगात कोरोना नामक महाभयंकर आजाराने थैमान माजवलं यामुळे संपूर्ण जगाची परिस्थिती खूपच बिकट बनली होती.

यामुळे महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीत देखील खळखळाट निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत महाराष्ट्र शासनाला नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम देता येणे अशक्य बनले होते.

अशा परिस्थितीत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान देण्याचा ठाकरे सरकारचा निर्णय शिंदे सरकार हाणून पाडते की काय याबाबत शेतकर्‍यांमध्ये मोठी संभ्रमता होती.

मात्र शिंदे सरकारने ठाकरे सरकारचा निर्णय जशास तसा ठेवून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान देण्याची आता थेट तारीखच डिक्लेअर केली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान सप्टेंबर महिन्यापासून दिले जाणार आहे. तसेच राज्यातील पूरग्रस्त लोकांना देखील 15 हजारांची तात्काळ मदत दिली जाणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

विधानसभेत बोलताना एकनाथ शिंदे यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे निश्चितच गेल्या अनेक दिवसांपासून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांच्या अनुदानाचा मुद्दा लवकरच मार्गी लागणार असल्याचा सांगितले जात आहे.