Aadhar-Pan Link : आधार कार्ड हे जवळपास सर्वच सरकारी तसेच महत्वाच्या खाजगी व्यवहारांसाठी आता आवश्यक झाले आहे. कोणतीही सरकारी योजना असो त्यासाठी आपल्याला आधार कार्डची गरज भासते.

अनेक सेवांसाठी ते आपल्याला आवश्यक आहे. बँकेत खाते उघडण्यापासून ते आपले डीमॅट खाते बनवण्यापर्यंत आपल्याजवळ आधार कार्ड असणे आवश्यक आहे.

आज आपण त्यासंबंधित महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत. दरम्यान सर्व पॅन कार्डधारकांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. अलीकडेच, सरकारने एक मोठी घोषणा केली आहे, ज्यामध्ये सरकारने सर्व पॅनकार्ड धारकांना त्यांचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यासाठी अलर्ट जारी केला आहे.

जर तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले नसेल तर ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा अन्यथा तुम्हाला मोठा धक्का बसू शकतो.

पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2022 पर्यंत सरकारने दिली होती, मात्र काही काळानंतर सरकारने दंडासह ही मुदत 30 जूनपर्यंत वाढवली. जर तुम्ही आतापर्यंत ही लिंकिंग प्रक्रिया पूर्ण केली नसेल, तर तुम्हाला पुढे जाऊन या प्रक्रियेसाठी दुप्पट दंड भरावा लागेल.

आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे भारतातील कोणत्याही नागरिकासाठी सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज मानले जातात. या दोन्हींद्वारे भारतीय नागरिकाची ओळख पटू शकते.

तुम्ही आता या दोघांची लिंकिंग प्रक्रिया ३१ मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करू शकता, पण आता तुम्हाला यासाठी दुप्पट दंड भरावा लागेल.

1 एप्रिल 2022 पासून पॅन कार्ड लिंकिंग प्रक्रिया पूर्ण करणाऱ्यांना 500 रुपयांपर्यंत दंड आकारण्यात आला होता, परंतु आता 1 जुलैनंतर ही प्रक्रिया पूर्ण करणाऱ्यांना 1000 रुपयांचा दंड आकारण्यास सुरुवात होईल.