MHLive24 टीम, 21 जानेवारी 2022 :- केंद्र सरकार असा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे की ज्याचा तब्बल लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. होय केंद्र सरकार आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याबरोबर घरभाडे भत्यामध्ये देखील वाढ करण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकार लवकरच हा निर्णय घेऊ शकते.(7th Pay Commission)

वित्त मंत्रालय या संदर्भात 11.56 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्ता (HRA) लागू करण्याच्या मागणीवर अर्थ मंत्रालयाने विचार सुरू केला आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना जानेवारी 2021 पासून एचआरए मिळेल. या कर्मचाऱ्यांना एचआरए मिळताच त्यांच्या पगारात प्रचंड वाढ होणार आहे.

इंडियन रेल्वे टेक्निकल सुपरव्हायझर्स असोसिएशन (IRTSA) आणि नॅशनल फेडरेशन ऑफ रेल्वेमेन (NFIR) यांनी 1 जानेवारी 2021 पासून HRA लागू करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर ते सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारावर लागू केले जाऊ शकते.

शहरानुसार एचआरए उपलब्ध आहे

घरभाडे भत्ता (HRA) ची श्रेणी X, Y आणि Z वर्ग शहरांनुसार आहे. म्हणजेच X श्रेणीत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता दरमहा ५४०० रुपयांपेक्षा जास्त एचआरए मिळणार आहे. यानंतर, Y वर्गाच्या व्यक्तीला दरमहा 3600 रुपये आणि नंतर Z वर्गाच्या व्यक्तीला प्रति महिना 1800 रुपये HRA मिळेल.

50 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली शहरे X श्रेणीत येतात. या शहरांमधील केंद्रीय कर्मचाऱ्यांना 27 टक्के एचआरए मिळेल. Y श्रेणीतील शहरांमध्ये 18% आणि Z श्रेणीत 9% असेल.

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup