कायम निरुपयोगी म्हटल्या जाणाऱ्या ‘ह्या’ पिकाचे घ्या खास पद्धतीने उत्पादन; होईल बक्कळ कमाई

MHLive24 टीम, 9 सप्टेंबर 2021 :- परंपरागत चालत आलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये शेतकरी त्याच-त्या पिकांची लागवड करत असतो. त्यामधून त्याला चांगले उत्पन्नही मिळत नाही. शेतीसाठी खर्च केलेला पैसाही त्याला परत मिळत नसतो. यासाठी उत्पन्नामध्ये होणारी घट, वाढत्या रोगांचे आणि किडींचे प्रमाण, योग्य बाजारपेठ व इतर मुद्दे मारक ठरतात. ( Castor crop production )

त्यासाठी शेतकरी कमी खर्चात जास्त उत्पन्न देणाऱ्या पिकांच्या शोधात आहेत. त्यामधूनच एक पीक पुढे येते आहे, आणि ते म्हणजे एरंड. तसे बघितले तर एरंडचा पीक म्हणून शेतकऱ्यांनी कधी विचार केलेला नाही.

एकेकाळी कुठे तरी बांधावर लावल्या जाणाऱ्या एरंडाकडे आता व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिले जाऊ लागले आहे. शाश्‍वत उत्पन्न मिळवून देणारे पीक अशी एरंडाची नवी ओळख तयार होत आहे. औषधी वनस्पती असल्याने एरंडाला बाजारात मागणीही चांगली असते. विशेषत: एरंडीचे तेल निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून खरेदी केली जाते.

Advertisement

पूर्वमशागत- एरंड पिकासाठी नांगरट खोलवर करावी कारण याच्या मुळ्या खोलवर जात असतात; नांगरट झाल्यावर कुळवणी करून घ्यावी.

जमीन आणि हवामान- हे पिक हलक्या किंवा मध्यम जमिनीमध्ये उत्तम पद्धतीने येते. त्यासाठी कोरडे आणि उष्ण हवामान चांगले त्याच बरोबर अवर्षणप्रवण भागामध्ये सुद्धा ४०-५० सेंमी पावसात येऊ शकते.

पेरणी/लागवड- या पिकाची लागवड खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात करू शकता. जून महिन्यामध्ये पुरेसा पाऊस झाल्यावर जमिन वापष्यावर आल्यावरती लागण करावी. त्याचबरोबर एरंड या पिकाची लागवड आकस्मिक काळातील पिक म्हणून पण लागवड करता येते.

Advertisement

३ ते ५ किलो प्रती एकर बियाण्याची गरज भासते. बियाण्याला ट्रायकोडरमा ५ ग्रा. प्रती किलोने बीज प्रक्रिया करून घ्यावी. दोन पिकांमधील अंतर ९० सेंमी व दोन ओळी मधील अंतर १५० सेंमी ठेवावे.

काढणी- हे पिक काढणीसाठी साधारणत लागवडीनंतर ५-६ महिन्यामध्ये तयार होते. घडामधील २-३ दाने वाळले कि काढणीला सुरवात करावी. घडाची काढणी २-३ फेऱ्यात करावी लागते. एरंडाची मळणी पारंपारिक पदधतीने बडवून केली जाते. आज बाजारामध्ये एरंड मळणी यंत्र उपलब्ध आहेत. त्या द्वारेही आपण मळणी करु शकतो.

उत्पन्न- १०-२० क्विंटल (जिरायती पीक) व २०-३० क्विंटल (बागायती पीक)

Advertisement

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker