Cars Waiting Period : सध्या भारतात कार्सची मागणी प्रचंड आहे. MPV सेगमेंटमध्ये, Kia Carens, Maruti Ertiga आणि Maruti XL6 वर जास्त वेटिंग पीरियड दिसत आहे. अहवालानुसार, कॅरेन्सच्या 1.4-लिटर टर्बो-पेट्रोल व्हेरिएंटचा सरासरी वेटिंग पीरियड पाच ते सहा महिने आहे, जो मॉडेलवर अवलंबून आठ महिन्यांपर्यंत जाऊ शकतो.

Kia Carens मधील DCT ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह प्रेस्टीज प्लस आणि लक्झरी प्लस सारख्या टॉप-एंड ट्रिमला जास्त मागणी आहे, त्यामुळे या मॉडेल्सचा वेटिंग पीरियडही जास्त आहे. जर तुम्हाला केरेन्सचे डिझेल व्हेरियंट विकत घ्यायचे असेल, तर तुम्हाला लक्झरी प्लस एटीव्हेरियंटसाठी सरासरी आठ ते नऊ महिने आणि 10 महिने वेटिंग करावी लागेल.

Kia Seltos SUV च्या डिझेल व्हेरियंट साठी कमालवेटिंग पिरियड सात महिन्यांपर्यंत आहे. LXi आणि VXi ट्रिम्सवर चार ते पाच महिन्यांव्यतिरिक्त, टॉप-स्पेक ZXi आणि ZXi+ ऑटोमॅटिक व्हेरियंटसाठी मारुती एर्टिगामध्ये जास्तीत जास्त सहा महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी आहे.

सीएनजी व्हेरियंटसाठी तुम्हाला सहा महिने वाट पाहावी लागेल. मारुती एर्टिगा किआ केरेन्स सारख्या प्रीमियम फीचर्सनी सुसज्ज आहे, परंतु असे असूनही ते थोडे महाग असले तरी मायलेजमुळे ते सेगमेंटमध्ये आपले स्थान कायम राखते.

मारुतीच्या 6-सीटर XL6 चा वेटिंग पीरियड  सर्वात कमी आहे. त्याच्या ऑटोमेटिक व्हेरियंटसाठी प्रतीक्षा कालावधी पाच महिन्यांपर्यंत आहे. मॅन्युअल प्रकारासाठी सरासरी तीन ते चार महिन्यांचा वेटिंग पीरियड आहे. सेमीकंडक्टर पुरवठा समस्या हळूहळू सुधारत आहे ज्यामुळे प्रोडेक्शन वाढत आहे. येत्या काही महिन्यांत वेटिंग पीरियड आणखी कमी होण्याची अपेक्षा आहे.