ATM मधून पैसे निघत नाहीत? ‘ह्या’ क्रमांकावर RBI कडे करा तक्रार, बँकेला होईल 10 हजारांचा दंड

MHLive24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :- भारतीय रिझर्व्ह बँकेने एटीएमसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआयने म्हटले आहे की ज्या बँकेच्या एटीएममध्ये पैसे नाहीत त्यांच्यावर दहा हजार रुपये दंड आकारला जाईल. या परिस्थितीत ग्राहक रिझर्व्ह बँकेच्या सोशल मीडिया अकाऊंटवर किंवा फोन नंबर 011-23711333 वर कॉल करून तक्रार करू शकतात.

देशातील सर्वात मोठ्या बँकेने व्हाईट लेबल एटीएम ऑपरेशनसाठी नियम जारी केले आहेत. WLAO कंपन्यांच्या माध्यमातून ATM मध्ये पैसे टाकले जातात. RBI ने सूचना दिल्या आहेत की बँकांना ATM मध्ये पैसे संपणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. नियम न पाळणाऱ्या बँकेला दंड आकारला जाईल. हा नियम 1 ऑक्टोबर 2021 पासून लागू आहे.

आरबीआयचे निर्देश :- आरबीआयने म्हटले आहे की एटीएममध्ये पैसे संपणार नाहीत याची खात्री बँकांना करावी लागेल. यासाठी बँका आणि डब्ल्यूएलएओला वॉच ठेवावा लागेल. पैसे संपल्यानंतर, एटीएममध्ये रोख रक्कम लवकरात लवकर जमा करावी, जेणेकरून जनतेला कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागणार नाही. जेव्हा अनेक ग्राहक ATM मधून पैसे काढतात आणि पैसे निघणार नाहीत तेव्हा हा दंड आकारला जाईल. अशा परिस्थितीत ग्राहक रिझर्व्ह बँकेकडे तक्रार करू शकतो.

Advertisement

10 तासांपेक्षा जास्त काळ रोख रकमेची कमतरता नसावी :- रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार एटीएममध्ये पैसे नसल्यास संबंधित बँकेवर दंड आकारला जाईल. बँक नंतर व्हाईट लेबल एटीएम ऑपरेशनमधून वसूली करू शकते. नियमानुसार, महिन्यामध्ये 10 तासांपेक्षा जास्त एटीएममध्ये पैशांची कमतरता असू नये. यापेक्षा जास्त वेळ लागला तर बँकेला दहा हजार रुपये दंड भरावा लागेल. डब्लूएलएओच्या बाबतीतही, बँक दंडास पात्र असेल. WLAO कडून किती दंड भरावा हे बँकेला ठरवायचे आहे.

बँका दंडाविरोधात अपील करू शकतात :- जर बँकेला किंवा डब्ल्यूएलएओला दंडाच्या विरोधात अपील करायचे असेल तर क्षेत्रीय कार्यालयाशी संपर्क साधावा लागेल. यासाठी एक महिन्याच्या आत अपील दाखल करावे लागेल.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker