एका FASTag ने दोन गाड्या चालवू शकतो का ? रिफंड न मिळाल्यास काय करावे? अशा तुमच्या मनातील फास्टटॅग विषयी आठ प्रश्नाची उत्तर

MHLive24 टीम, 29 जुलै 2021 :- फास्टटॅग म्हणजे एक डिजिटल स्टिकर. रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजी – RFID तंत्रज्ञानावर हे स्टिकर काम करतं. रोख पैशांचे व्यवहार न करता टोल भरण्यासाठी या फास्टॅगचा वापर होईल. सध्या रोख पैसे देऊन वा कॅशलेस अशा दोन्ही पद्धतींनी टोल भरता येतो.

पण नवीन नियमांनुसार हा फास्टॅग असणाऱ्या गाड्यांना टोल नाक्यावर थांबावं लागणार नाही. या व्यक्तीच्या टोलची रक्कम टॅगशी जोडलेल्या प्री-पेड अकाऊंट वा बँक अकाऊंटमधून कापली जाईल.

FASTag ची वैधता किती आहे ? :- फास्टॅगची वैधता 5 वर्षांची आहे आणि खरेदी केल्यानंतर वापरानुसार त्यास केवळ रिचार्ज / टॉप करावे लागते.

Advertisement

फास्टॅग कितीला खरेदी करू शकता ? :- रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्रालयाच्या (भारत सरकार) मार्गदर्शक तत्वांनुसार, फास्टॅगची किंमत 100 रुपये आहे. मात्र, काही बँका मोफत देत आहेत. फास्टॅग लिंक वॉलेटला फंड करण्यासाठी बँका ग्राहकांकडून एक्स्ट्रा चार्ज करतात आणि याची पूर्ण माहिती टॅग जारी करणार्‍या बँकांच्या वेबसाइटवर आहे.

जर टोल शुल्क दोन वेळा कापले गेले तर ? :- फास्टॅग जारी करणार्‍या बँकेच्या ग्राहक सेवा डेस्कशी संपर्क साधा आणि दोन वेळा शुल्क कापले गेल्याची माहिती द्या. ते तक्रारीची पडताळणी करतील आणि डुप्लिकेट ट्रान्जक्शनसाठी पैसे परत करतील.

रिफंड न मिळाल्यास काय करावे ? :- रिफंड न मिळण्याच्या स्थितीत फास्टॅग जारी करणार्‍या बँकेशी संपर्क साधा.

Advertisement

अकाऊंटमधून टोलचे पैसे कापले गेल्याचे कसे समजणार ? :- फास्टॅगद्वारे पैसे भरल्यानंतर टोलचे नाव, ट्रांन्जक्शनची तारीख, रक्कम आणि फास्टॅग खात्यात शिल्लक बॅलन्सची माहिती देणारा एसएमएस येतो.

माझ्याकडे दोन गाड्या आहेत, तर एकच फास्टॅग वापरू शकतो का ? :- ग्राहक एका वाहनासाठी केवळ एकच फास्टॅगचा वापर करू शकतो. एकदा लावलेला फास्टॅग काढला तर तो खराब होईल, टोल प्लाझावर चालणार नाही.

फास्टॅग बंद किंवा हस्तांतरीत कसा करू शकतो ? :- आपला फास्टॅग बंद करण्यासाठी आपल्याला आपल्या बँक किंवा वॉलेट कंपनीशी संपर्क साधावा लागेल. आपण ग्राहक सेवा केंद्राच्या नंबर्सवर कॉल करून आपण सहजपणे फास्टॅग बंद करू शकतो. आवश्यक असल्यास आपला नवीन टॅग बनवून घेता येईल.

Advertisement

याशिवाय पेटीएममध्ये फास्टॅग हस्तांतरीत करण्याचा पर्यायदेखील देण्यात आला आहे. त्याआधारे आपण आपला फास्टॅग इतर कोणत्याही फोन नंबरवर हस्तांतरीत करू शकतो. त्यानंतर फास्टॅग दुसऱ्या नंबरशी संलग्न केला जाईल. आपण पेटीएमच्या अ‍ॅपवरून हे कार्य करू शकतो. फास्टॅग बंद करण्यासाठी आपल्याला ग्राहक सेवा केंद्राशी बोलून घेणे आवश्यक आहे.

काच किंवा टॅग फुटल्यास काय करावे ? :- जर तुमच्या कारची काच फुटली किंवा टॅग तुटला तर तुम्ही नवीन फास्टॅग मिळवू शकता. यासाठी तुम्हाला बँकेशी संपर्क साधावा लागेल किंवा जेथे फास्टॅग उपलब्ध असेल तेथे तुम्हाला जावे लागेल. तेथे जाऊन तुम्ही नवीन फास्टॅग घेऊ शकता. फास्टॅगकडून हा पर्याय देण्यात आलेला आहे. त्यामुळे आपल्या गाडीची काच फुटली वा या ना त्या कारणामुळे फास्टॅग तुटला तर अशा परिस्थितीत आपल्याला घाबरून जाण्याची गरज नाही, हे लक्षात ठेवा.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker