महत्वाची बातमी : उद्या दुपारी जाहीर होणार दहावीचा निकाल !

MhLive24 टीम , 28 जुलै  2020 :- दहावीच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.

मार्च 2020 मध्ये एकूण 9 बोर्डात दहावीची परीक्षा झाली होती.  या दहावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी (29 जुलै) रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. या परीक्षेत झालेल्या सर्व विषयांचे गुण वेबसाईटवर पाहता येतील.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे यंदा दहावी परीक्षेचा निकाल लांबणीवर गेला होता. लॉकडाऊनमुळे  पोस्ट कार्यालय आणि शाळांमध्ये दहावीच्या उत्तरपत्रिका मोठ्या प्रमाणात तपासाविना पडून होत्या त्यामुळे यंदा या निकालास विलंब झाला आहे.

Advertisement

www.maharesult.nic.in

www.sscresult.mkcl.org

www.maharashtraeducation.com

Advertisement

या वेबसाईटवर निकाल पाहू शकता,तर www.maharesult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्याच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahasscboard.in या संकेतस्थळावर एकत्रित निकाल उपलब्ध केला जाईल.

यावर्षी दहावीची लेखी परीक्षा 3 मार्च ते 23 मार्च या काळात आयोजित करण्यात आली होती. दहावीचा शेवटचा भुगोलाचा पेपर होता. पण कोरोनाच्या वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे हा पेपर रद्द करण्याचा निर्णय शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केला होता

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Advertisement

Mhlive24.com वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा mhlive24@gmail.com वर

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker