नवीन कार घेताय ? मग ‘ह्या’ सहा गोष्टी नेहमी लक्षात ठेवा ; होईल फायदाच फायदा

MHLive24 टीम, 28 जुलै 2021 :- नवीन गाडी घेतोय ना, म्हणजे काही प्रॉब्लेमच नाही. अशा भ्रमात राहून तुम्ही थेड गाडी विकत घ्यायला जात असाल, तर जरा थांबा! जुन्या गाडय़ांच्या तुलनेत नवीन गाडी घेताना फार गोष्टींचा विचार करावा लागत नाही. पण तरीही नवीन गाडी विकत घेण्याआधी काही गोष्टींची काळजी घेणे कधीही चांगलेच.

कार विकत घेणे ही सर्वांच्याच आयुष्यातील एक ध्येयवादी स्वप्न असते आणि निश्चितच आपण या गोष्टीकडे एका माईलस्टोन प्रमाणे पाहत असतो आणि म्हणूनच या आनंददायी निवडीत आपला अभ्यास कुठेही कमी पडू नये आपली गाडीची निवड ही अतिशय योग्य असावी यासाठी कोणती काळजी घ्यावी ते पाहूयात.

आर्थिक नियोजन
तुम्ही एखाद्या गाडीसाठी किती पैसे खर्च करणार आहात, याचा अंदाज घेऊन त्यानुसार नियोजन असायला हवे. तुम्ही गाडी निवडलीत की तिची किंमत आणि ती गाडी विक्रेत्यांचा शोधही महत्त्वाचा असतो. गाडी विक्रेता शक्यतो तुमच्याच शहरात असावा. तसंच गाडी घेण्याची वेळ एखाद्या सणावाराच्या आसपास असली,

Advertisement

तर त्याचा फायदा नक्कीच होऊ शकतो. गाडी घेताना काही सूट किंवा सवलत मिळू शकते का, हे तपासणेही महत्त्वाचे असते. एखाद्या बँकेकडून कर्ज काढून गाडी घेत असाल, तर कमीतकमी व्याजदर हा मुद्दा विचारात घ्यायला हवा. तसेच गाडीबरोबर वॉरंटी किंवा काही सेवा करारही केला जाणार आहे का, याबाबतही चौकशी करा.

गाडीची निवड
एकदा या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली की, गाडीची निवड आणखीनच सोपी होते. नेमकी कोणती गाडी घ्यायची, हे ठरवण्यासाठी विविध गाडय़ांचे रिव्ह्य़ू वाचणे कधीही चांगले! तज्ज्ञांनी हे रिव्ह्य़ू लिहिले असल्याने गाडीच्या तांत्रिक अंगांची सखोल माहिती त्यातून मिळू शकते.

तसेच गाडीची अंतर्गत रचना, सोयीसुविधा यांचीही सखोल माहिती तुम्हाला या रिव्ह्य़ूजमधून मिळते. हे रिव्ह्य़ू विविध संकेतस्थळांवर उपलब्ध असल्याने त्यासाठी काही विशेष खर्चही येत नाही. तसेच घरबसल्याही तुम्ही रिव्ह्य़ू बघू शकता.

Advertisement

या संकेतस्थळांवर दोन गाडय़ांची तुलना करण्याचाही पर्याय उपलब्ध असल्याने तुम्हाला आवडलेल्या दोन किंवा तीन गाडय़ांची एकाच वेळी तुलना करणेही शक्य आहे. या तुलनेमुळे कोणत्या गाडीत नेमक्या कोणत्या गोष्टी जास्त आहेत किंवा दोन गाडय़ांच्या किमतीमधील फरक का आणि किती आहे, हे तुम्हाला सहज समजू शकेल.

सेफ्टी
आपल्या निवडीच्या ब्रँड्स पैकी जास्तीत जास्त सेफ्टी आपल्याला कोणती कार देऊ शकते हे पाहावे. आपल्या शासनाद्वारे सुद्धा गाड्यांच्या गुणवत्तेकरिता काही मापदंड दिलेले असतात.

त्या व्यतिरिक्त सुद्धा कोणती सेफ्टी आपल्याला मिळते याकडे आपण लक्ष द्यावयास हवे. ऑक्टोबर 2019 पासून सर्व्यागाड्यांना एबीएस, रिवर्स पार्किंग सेन्सर हे अनिवार्य केले आहे.

Advertisement

पेट्रोल की डिझेल?
गाडी घेतांना सर्वात जास्त चर्चा या गोष्टींची होते की पेट्रोल गाडी घ्यावी की डिझेल? यातील एक साधं उत्तर असं दिलं जातं की पेट्रोल आणि डिझेल मधील किमतींचा फरक. परंतु एवढेच नसून डिझेल इंजिन हे पेट्रोल इंजिन पेक्षा महाग असते आणि त्यामुळेच फक्त इंधनावरील खर्च न पाहता इंजिन आणि मेंटेनन्स खर्च कडेही लक्ष द्यायला हवे.

तरीसुद्धा एक वैज्ञानिक उत्तर सांगायचे झाल्यास जर तुम्हाला तुमचा वापर हेवी लोड साठी असेल तर डिझेल गाडी वापरावी आणि जर तुमची गरज ही साधारण प्रवास असेल तर पेट्रोल गाडी घ्यावी.

डिस्काउंट ऑफर
ऑफर मिळत असल्यास त्याचा लाभ अवश्य घ्यावा. जर डीलर तुम्हाला सध्या काहीच ऑफर नाही किंवा पुढे सुद्धा ऑफर ची काही शाश्वती नाही असे सांगत असल्यास आपण ऑनलाइन किंव्हा त्या ब्रँडच्या वेबसाईटवर पाहू शकता

Advertisement

जिथे आगामी ऑफस सांगितल्या जातात त्याच बरोबर भारतात मुख्यत्वे दिवाळीमध्ये ऑफर्स निघतात आपण ही एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की गरजेपेक्षा भरपूर ऑफर मिळत असतील तर लवकरच त्या सेगमेंटमध्ये एखादी नवीन गाडी उपलब्ध होईल याचा अंदाज बांधता येऊ शकतो.

कारण जागतिक ब्रँडचे नवनवीन कार्स ह्या क्रिसमस आणि नववर्षाला लॉन्च होत असतात. त्यामुळेजर आपल्याला वेळेचे बंधन नसेल, तर ऑफर्स पेक्षाही नव वर्षापर्यंत थांबल्यास याचा फायदा निश्चितच आपल्याला होऊ शकतो.

जर एखाद्या चांगल्या खूप मागणी असलेल्या गाडीत एखादीच कमतरता किंवा उणिव जाणवत असेल आणि आपल्याला एकाच प्रकारचे ऑनलाइन फीडबॅक पाहायला मिळत असेल तर अशा त्रुटी नवीन मॉडेल्समध्ये दुरुस्त केल्या जातात

Advertisement

कुटुंबाचा विचार
घरात किती सदस्यआहेत त्यानुसार आपल्याला कोणती कार घ्यायची ते ठरवा. घरात तीन-चार जणं असतील तर हॅचबॅक किंवा सेदान कार घेऊ शकतात, आणि जर सात-आठजणं असतील तर एमपीव्ही कार घेऊ शकतात. कारमध्येसुद्धा सेगमेंट असतात, हॅचबॅक, सेदान, एमपीव्ही, एसयूव्ही असे सेगमेंट असतात. आपल्याला या सेगमेंट मधल्या कोणत्या कारची गरज आहे ते पाहून कारची निवड करा.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker