फ्लॅट खरेदी करायचाय? तेही अगदी स्वस्तात? मग ‘ही’ तुमच्या फायद्याची बातमी वाचाच

MHLive24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- घर खरेदी करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असतं. मात्र आता सर्वसामान्यांच्या स्वप्नाला वाव मिळणार आहे. प्रमुख सार्वजनिक बँकांपैकी एक असणाऱ्या बँक ऑफ बडोदाकडून लवकरच मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे. करोड रुपयांची प्रॉपर्टी लाखो रुपयांमध्ये मिळणार आहे.या लिलावात घरं, दुकानं आणि प्लॉट स्वस्तात खरेदी करण्याची संधी चालून आली आहे. (  Buy a flat in pretty cheap )

देशातील अनेक शहरांमध्ये असणाऱ्या मालमत्तांसाठी ही लिलाव प्रक्रिया पार पडेल. तुम्ही त्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने सहभागी होऊ शकता.ही लिलाव प्रक्रिया दीर्घकाळा सुरु राहणार असून त्याची सुरुवात 8 सप्टेंबरपासून होणार आहे. बँकेच्या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही कोणत्या शहरांसाठी कधी लिलावप्रक्रिया पार पडेल, याची तपशीलवार माहिती जाणून घेऊ शकता.

साधारणत: ऑनलाईन लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठीतुम्हाला अर्नेस्ट मनी डिपॉझिट आणि केवायसी संबंधित बँकेच्या नजीकच्या शाखेत जमा करावे लागतात. तसेच लिलावत सहभागी होणाऱ्या व्यक्तीची डिजिटल सिग्नेचरही गरजेची असते. डिपॉझिट जमा केल्यानंतर संबंधित व्यक्तीला बँकेकडून लिलावात सहभागी होण्यासाठी लॉगिन आयडी आणि पासवर्ड दिला जातो.

Advertisement

कोणत्या शहरांमध्ये मालमत्तांचा लिलाव ? :- बँक ऑफ बडोदाकडून कोणत्या शहरातील मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे, हे शोधणे अगदी सोपे आहे. त्यासाठी तुम्हाला बँकेच्या संकेतस्थळावर जावे लागेल.

याशिवाय, https://www.bankofbaroda.in/e-auction.htm?utm_source=SM&utm_medium=Post&utm_campaign=MegaAuction_km या लिंकवर क्लिक करून तुम्ही थेट लिलाव प्रक्रियेच्या पेजवर जाऊ शकता. यामध्ये तुम्हाला कोणत्या विभागात आणि कोणत्या तारखेला मालमत्तांचा लिलाव होईल, याचा तपशील मिळेल.

 

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker