MHLive24 टीम, 10 सप्टेंबर 2021 :- कोरोना महामारीमध्ये रेस्टॉरंट बिझनेसवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. आधीच लॉकडाऊनमुळे रेस्टॉरंट बंद ठेवावं लागणं किंवा अर्ध्या क्षमतेनी सुरू ठेवणं अशा नियमांमुळे ग्राहक नाहीत. त्यात जे ग्राहक येतात त्यांनाही हायजीनबाबत असलेली भीती. बहुतांश रेस्टॉरंट्समध्ये प्लॅस्टिकच्या भांड्यांचा वापर केला जातो. ( Business with small capital )

ही भांडी व्यवस्थित स्वच्छ करण्यात आलीत का हे पाहणं आपल्याला शक्य नसतं. तसेच, वारंवार विविध लोकांचे हात या भांड्यांना लागल्यामुळे त्यातून विषाणूचा संसर्ग होण्याची भीतीही असते. अशा पार्श्वभूमीवर जर आपण बारकाईने विचार केला तर एक युनिक बिझनेस आयडिया समोर येऊ शकते.

तुम्ही सरकारच्या मदतीने अगदी कमी भांडवलात कटलरी भांड्याच्या युनिटचा व्यवसाय सुरु करु शकता. कटलरी ही किचनमध्ये हमखास लागणारी गोष्ट आहे. त्यामुळे बाजारपेठेत कटलरी भांड्यांना चांगली मागणीही असते. त्यामुळे हा व्यवसाय तुमच्यासाठी चांगली संधी ठरू शकते.

तुमच्याकडे फारसे भांडवल नसेल तरी हा व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार तुम्हाला आर्थिक मदत करेल. मुद्रा कर्ज योजनेतंर्गत तुम्ही कर्ज घेऊ शकता.

कटलरी युनिटच्या उभारणीसाठी किती खर्च? :- कटलरी युनिटसाठी साधारण साडेतीन लाखांचा खर्च येतो. यापैकी सेटअपसाठी 1.80 लाखांची गरज असते. यामध्ये मशीन, वेल्डिंग सेट, ड्रिलिंग मशीन, बेंच ग्रिडर, पॅनल बोर्ड अशा उपकरणांचा समावेश असतो. याशिवाय, कच्च्या मालासाठी साधारण सव्वा लाख रुपये लागतात. याशिवाय, मजूर, ऑफिसमधील कर्मचारी आणि इतर खर्चासाठी महिन्याला साधारण 30 हजार रुपयांचा खर्च येतो. युनिटसाठी सगळा मिळून साधारण 3.30 लाखांचा खर्च येतो.

यापैकी 1.14 लाखांचे भांडवल तुम्हाला उभारावे लागते. उर्वरित पैशांच्या उभारणीसाठी सरकारकडून मदत केली जाते. त्यासाठी तुम्हाला बँकेत मुद्रा कर्ज योजनेतंर्गत अर्ज करावा लागतो. तुम्ही सर्व निकष पूर्ण केल्यास तुम्हाला आर्थिक मदत मिळते.

व्यवसायातून किती कमाई होते ? :- सरकारी अहवालातील माहितीनुसार, महिन्याला साधारण 1.10 लाख रुपयांची उलाढाल होते. यापैकी जवळपास 91 हजार रुपये खर्च असतो. त्यामुळे तुम्हाला साधारण 18000 हजार रुपये वरकड रक्कम मिळेल. यामधून कर्जाचा हप्ता आणि इतर खर्च वगळल्यास तुम्हाला महिन्याला किमान 14400 रुपयांचा फायदा होईल.

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

 

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology