Business loan on whatsapp : व्हॉट्सअॅपवर 10 मिनिटांत मिळेल बिजनेस लोन , जाणून घ्या सविस्तर

MHLive24 टीम, 12 ऑक्टोबर 2021 :- इंस्टंट मेसेजिंग ॲप व्हॉट्सॅपवर आता भारतात नागरिकांना कर्ज देणार आहे. कंपनीने यासाठी अनेक भारतीय बँकांसह भागीदारी केली आहे. याशिवाय कमी उत्पन्न असणार्‍या कर्मचार्‍यांसाठी देखील आता व्हॉटसअॅप विमा आणि पेंशनची व्यवस्था करणार आहे.(Business loan on whatsapp )

फेसबुकच्या मालकीच्या व्हॉट्सॅपने या सेवेसाठी आयसीआयसीआय आणि एचडीएफसी बँकेसोबत भागीदारी केली आहे. सध्या व्हॉट्सॅपच्या या सेवेंतर्गत ग्रामीण भागात विमा आणि पेंशन देणार असल्याचे सांगितले जात आहे.

काही मिनिटांत मंजुरी

Advertisement

आयआयएफएलने एका निवेदनात म्हटले आहे की वापरकर्ते कमीतकमी कागदपत्रे आणि मंजुरीसह काही मिनिटांत 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतील. आयआयएफएल फायनान्सने फिनटेक फर्म सेतूसोबत भागीदारी केली आहे.

आयआयएफएल फायनान्सचे चीफ रिस्‍क ऑफ‍िसर संजीव श्रीवास्तव म्हणाले, “आयआयएफएल फायनान्स, सेतू या आमच्या तंत्रज्ञान सेवा प्रदात्यासह, गप्पा सुलभ करून कर्ज अर्ज आणि वितरणाच्या जटिल प्रवासाला आणत आहे.

बँकेसोबत भागीदारी अंतर्गत ग्राहक बँकेला ऑटोमेटेड टेक्स्टद्वारे संवाद साधू शकतील. यासाठी बँकेत व्हॉट्सअ‍ॅप नंबर रजिस्टर करावा लागेल. यानंतर ग्राहकांना खात्यातील रक्कमेपासून ते खात्यासंबंधी इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवरच मिळेल.

Advertisement

व्हॉट्सअ‍ॅप इंडियाच्या प्रमुखांनी म्हटले की, येत्या दोन वर्षांत बँकांसोबत मिळून कमी उत्पन्न असलेल्या कामगारांसाठी विमा, मायक्रो क्रेडिट आणि पेन्शनसारख्या सुविधा सुलभ करण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. कंपनी लवकरच पायलट प्रकल्प सुरू करण्याची तयारी करत आहे.

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker