Business Idea : प्रत्येक व्यक्तीस आपले अनेक स्वप्न पूर्ण करण्यासाठी पैशांची गरज असते. यासाठी अनेकजण आपल्या परीने कष्ट करत असतात.

आज आम्ही तुमच्या कष्टाला पंख देतील अशी एक व्यवसाय कल्पना घेऊन आलो आहोत. आम्ही तुम्हाला अशा व्यवसायाबद्दल सांगणार आहोत, जो सुरू करून तुम्ही भरपूर कमाई करू शकता.

वास्तविक जर तुम्हाला कमी वेळेत जास्त पैसे कमवायचे असतील तर आज आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम बिझनेस आयडिया घेऊन आलो आहोत, हा व्यवसाय सुरू करून तुम्ही लवकरच करोडपती होऊ शकता.

आम्ही पेट्रोल आणि डिझेल ऑनलाइन विक्रीच्या व्यवसायाबद्दल बोलत आहोत, तुम्ही पेट्रोल डिझेल घरोघरी पोहोचवण्याचा व्यवसाय सुरू करू शकता.

हा सध्या नवीन व्यवसाय आहे. यामध्ये अद्याप कोणतीही स्पर्धा नाही. देशातील वाहनाची वाढती संख्या पाहता पेट्रोल आणि डिझेलची मागणी झपाट्याने वाढत आहे.

तुम्हाला पेट्रोल आणि डिझेलची ऑनलाइन विक्री सुरू करायची असेल, तर तुम्हाला तेल कंपन्यांशी संपर्क साधावा लागेल. त्याच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर तुम्ही ते सुरु करू शकता.

अॅप बनवणे आवश्यक आहे 2016 पूर्वी पेट्रोल आणि डिझेलव्या ऑनलाइन विक्रीला परवानगी नव्हती. यानंतर सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या ऑनलाइन विक्रीला परवानगी दिली, हा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रकल्पाचा तपशीलवार अहवाल तेल कंपन्यांना सादर करावा लागणार आहे.

हा अहवाल अतिशय काळजीपूर्वक तयार करा आणि तो तेल कंपनीला सादर करा. तेल कंपन्यांना तुमचा प्रकल्प आवडला तर तुम्हाला ऑनलाइन विक्री करण्याची परवानगी दिली जाईल. त्यानंतर तुम्हाला ॲप किंवा वेबसाइट तयार करावी लागेल, याचे कारण म्हणजे तुम्हाला फक्त ऑनलाइन ऑर्डर ध्यायची आहे.

गुंतवणूक किती असेल जर तुम्ही पेट्रोल डिझाल होम डिलिकरी व्यवसाय सुरू केला तर त्यासाठी तुम्हाला सुमारे 12 लाख रुपये गुंतवावे लागतील. तुमच्याकडे एवढी रक्कम नसेल तर तुम्ही PM मुद्रा लोनद्वारे कोणत्याही बैंकेकडून 10 लाख रुपयकर्ज घेऊ शकता.

नोएडामध्ये ऑनलाइन इंधनाचा व्यवसाय सुरू आहे मीडिया रिपोट्सनुसार, नोएडामध्ये Peptuel.com (स्टार्टअप Pepluel.com) नावाने ऑनलाइन पेट्रोल-डिझेल वितरणाचा व्यवसाय सुरू आहे. पेपफ्युएलने 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. आज या कंपनीने चांगले स्थान प्राप्त केले आहे.