Mhlive24 टीम, 21 ऑक्टोबर 2020 :- यातच केंद्रातील मोदी सरकारने कर्मचाऱ्यांसाठी एक खुशखबर आणली आहे. ज्यामुळे या कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी आनंदाने उजळेल…

देशातील 30 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्याची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला.

कॅबिनेटच्या या निर्णयांबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, केंद्रीय कर्मचाऱ्यांना 3 हजार 740 कोटी रुपयांचा बोनस दिला जाणार आहे. 30 लाख कर्मचाऱ्यांना बोनसची रक्कम दसऱ्यापर्यंत त्यांच्या खात्यावर जमा झालेली पाहायला मिळेल.

केंद्र सरकारने रेल्वे, टपाल, संरक्षण, EPFO, ESIC सारख्या वाणिज्यिक आस्थापनांमधील विना-राजपत्रित कर्मचार्‍यांना 2019-2020 साठी प्रोडक्टिव्हिटी लिंक्ड बोनस (PLB) देण्यास मान्यता दिली आहे. यावर 2 हजार 791 कोटी रुपये खर्च होणार आहे.

केंद्र सरकारच्या विना-राजपत्रित कर्मचार्‍यांना नॉन-पीएलबी किंवा अ‍ॅडहॉक बोनस मंजूर करण्यात आले आहेत. याचा फायदा 13 लाख 70 हजार कर्मचार्‍यांना होईल आणि त्यावर एकूण 946 कोटी रुपये खर्च होणार आहेत.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology