Discount Offer on SUV: कार घ्यायचीय? ‘ह्या’ SUV वर मिळतिये 2.5 लाखांची बंपर सूट, त्वरा करा

MHLive24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :- जर तुमचेही स्वतःचे कार घेण्याचे स्वप्न असेल तर हि बातमी तुमच्या फायद्याची ठरेल. आपल्या हटके शैलीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या रेनॉल्ट इंडिया ही नेहमीच आपल्या कारवर मोठ्या ऑफर्स देत असते.(Discount Offer on SUV)

यावेळी कंपनीने आपल्या पावरफुल एसयूव्हीवर बंपर ऑफर दिली आहे, ज्याचा फायदा घेण्यासाठी आता शेवटचे दोन दिवस बाकी आहेत.

Renault च्या सर्वात लोकप्रिय Duster वर, कंपनी 2.5 लाख रुपयांपर्यंतचे बेनिफिट्स देत आहे, जे फक्त 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत उपलब्ध असतील.

Advertisement

म्हणजेच, जर तुम्ही आता ही SUV खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला थोडी चपळाई दाखवावी लागेल कारण ही ऑफर दोन दिवसांनी संपणार आहे.

50,000 रोख सवलत

Renault Duster SUV वर 2.5 लाख रुपयांपर्यंतचे एकूण बेनिफिट्स आहेत. ज्यात 50,000 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज बोनस, 50,000 रुपयांची रोख सूट आणि 30,000 रुपयांची कॉर्पोरेट डिस्काउंट यांचा समावेश आहे.

Advertisement

याशिवाय, कंपनीने डस्टरवर 1.10 लाख रुपयांपर्यंतचा विशेष लॉयल्टी बोनस देखील उपलब्ध करून दिला आहे. Renault ने Relive Scrappage पॉलिसी अंतर्गत रु. 10,000 चा वेगळा लाभ दिला आहे.

रेनॉल्ट डस्टर सह स्मार्ट केबिन

दमदार लुक असणाऱ्या रेनॉल्ट डस्टरसह एक स्मार्ट केबिन देण्यात आली आहे जी हाय-टेक फीचर्ससह येते. नवीन डस्टरमध्ये अनेक सेफ्टी फीचर्स देखील देण्यात आले आहेत. डस्टर दोन इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे, पहिले म्हणजे 1.5-लिटर नेचुरली एस्पिरेटेड 1.5-लिटर पेट्रोल इंजिन जे 105 Bhp आणि 142 Nm पीक टॉर्क बनवते.

Advertisement

दुसऱ्या क्रमांकावर 1.3-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे जे 154 Bhp पॉवर आणि 254 Nm पीक टॉर्क बनवते. कंपनीने या दोन्ही इंजिनांना 6-स्पीड मॅन्युअल आणि CVT गिअरबॉक्सचे पर्याय दिले आहेत.

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker