इमारत कोसळण्याचे सत्र सुरूच; पाच जणांची सुटका

मुंबई : जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारती कोसळून मुंबईत बळी जात आहेत. दुसरीकडे दरडी कोसळूनही मुंबईत बळी गेले आहेत. आता नव्या इमारती कोसळून शेजारच्या इमारतींनाही धोका होत आहेत.

पाच जणांवर उपचार सुरू

मुंबईत बांधकाम सुरू असणारी चार मजली इमारत समोरच्या तीन घरांवर कोसळली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या पाच जणांची अग्रिशमन दलाच्या अधिकारी, जवानांनी चार तासांत सुटका केली. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Advertisement

कुठे झाली घटना? ढिगा-याखालून चार तासांनी सुटका

मुंबईत मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास अंधेरी पश्चिममध्ये जुहू गल्ली परिसरात अमर सोसायटीमध्ये एका चार मजल्यांच्या इमारतीचे बांधकाम सुरू असताना ते बांधकाम समोरच्या तीन घरांवर कोसळले. या घरांच्या ढिगाऱ्याखाली पाच जण अडकले होते. त्यांना मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी तीन ते चार तासांमध्ये ढिगा-याखालून काढले. जखमींना जवळच्या कूपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

ढिगारा बाजूला करण्याचे काम सुरू

Advertisement

या सर्व घरांचा ढिगारा बाजूला करण्याचे काम मुंबई अग्निशमन दलाचे जवान आणि मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी करत आहेत. सध्या या परिसरात मोठ्या प्रमाणात वन चार मजल्यांची अनधिकृत घरे असल्यामुळे सर्वांच्याच मनामध्ये भीती पसरली आहे.

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker