BSNL चा एकदम स्वस्त प्लॅन; Airtel-Jio-Vi पेक्षा अनेक पटींनी भारी

MHLive24 टीम, 08 डिसेंबर 2021 :-  सध्या अनेक टेलिकॉम कंपन्यांमध्ये सपर्धा आहे. प्रत्येक कंपनी आपल्या पद्धतीने ग्राहकास आकर्षित करत असते. परंतु नुकतेच Airtel, Jio आणि Vi ने ग्राहकांना झटका दिला आहे. त्यांनी त्यांच्या प्लॅनच्या किमती वाढवल्या आहेत. त्यामुळे बहुतांश प्लॅन 25 रुपयांच्या पुढेच वाढले आहेत.(BSNL )

अशा परिस्थितीत वापरकर्ते स्वस्त आणि उत्तम प्लॅनच्या शोधात आहेत. आज आम्‍ही तुम्‍हाला बीएसएनएलच्‍या सर्वात स्वस्त प्‍लॅनबद्दल सांगणार आहोत, जो Airtel-Jio-Vi ला मागे टाकत आहे.

आम्ही तुम्हाला बीएसएनएलच्या 187 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनबद्दल सांगणार आहोत आणि या प्लॅनची Jio, Airtel आणि Vodafone Idea च्या 179 रुपयांच्या प्लॅनशी तुलना देखील करू.

Advertisement

बीएसएनएलचा 187 रुपयांचा प्लॅन

BSNL च्या 187 रुपयांच्या प्लॅनची वैधता 28 दिवस आहे. या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 SMS उपलब्ध आहेत. डेटा संपल्यानंतर इंटरनेट 80kbps च्या वेगाने चालते. अतिरिक्त फायद्यांबद्दल बोलतांना, प्लॅनमध्ये मोफत PRBT रिंगटोन देखील उपलब्ध आहेत.

जिओचा 179 रुपयांचा प्लॅन

Advertisement

Jio च्या 179 रुपयांच्या प्लॅनची वैधता 24 दिवस आहे, या प्लॅनमध्ये 24 दिवस दररोज 1GB डेटा मिळेल. याशिवाय, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस उपलब्ध असतील. अतिरिक्त फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, प्लॅनमध्ये Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud वर एक्सेस मिळेल.

एअरटेलचा 179 रुपयांचा प्लान

एअरटेलच्या 179 रुपयांच्या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये एकूण 2GB डेटा उपलब्ध आहे. याशिवाय अमर्यादित कॉलिंग आणि 300 एसएमएस उपलब्ध आहेत. इतर फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, 1 वर्षासाठी मोफत Amazon प्राइम व्हिडिओ सबस्क्रिप्शन, मोफत कॉलर ट्यून आणि विंक म्युझिकचा एक्सेस उपलब्ध आहे.

Advertisement

Vi चा 179 रुपयांचा प्लान

Vi च्या 179 रुपयांच्या प्लानची वैधता 28 दिवसांची आहे. प्लॅनमध्ये 2GB डेटा दिला जातो. यासह, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि 300 एसएमएस उपलब्ध आहेत. या प्लॅनमध्ये Vi Movies & TV बेसिक ऍक्सेस देण्यात आला आहे.

बीएसएनएलचा हा प्लॅन बाकीच्या प्लानपेक्षा चांगला आहे

Advertisement

बीएसएनएलचा 187 रुपयांचा प्लॅन बाकीच्या तुलनेत खूप चांगला आहे. बीएसएनएलच्या प्लॅनमध्ये 56GB डेटा दिला जातो. जिओच्या प्लॅनच्या तुलनेत बीएसएनएल डबल डेटा ऑफर करत आहे. या प्लॅनमध्ये Airtel आणि Vi प्लॅनपेक्षा जास्त डेटा उपलब्ध आहे.

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker