‘रुक्मिणी’ चा आग्रह मोडून मुख्यमंत्री बसले जमिनीवर

MHLive24 टीम, 25 जुलै 2021 :-  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंढरपुरात पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा केली. या वेळी रश्मी ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना खुर्चीवर बसण्याचा आग्रह केला; मात्र तरीही उद्धव यांनी जमिनीवर बसणंच पसंत केलं. महापूजेवेळी ठाकरे यांच्या साधेपणाचं दर्शन घडवणाऱ्या या व्हिडिओची सध्या ‘सोशल मीडिया’वर चर्चा आहे.

नेमकं काय घडलं ? :- विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा करण्यासाठी ठाकरे दांपत्य गाभाऱ्यात पोहोचले. या वेळी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांना खुर्चीवर बसण्यास सांगितलं. नार्वेकरांपाठोपाठ पत्नी रश्मी ठाकरे यांनीही पतीला खुर्चीवर बसण्याचा आग्रह केला.

शेजारीच असणारी खुर्ची नार्वेकर यांनी बसण्यासाठी पुढे केली. त्यामुळे आधी ठाकरे खुर्चीवर बसले आणि महापूजेला सुरुवात झाली. सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, पर्यटन मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे हे जमिनीवर बसले.

Advertisement

मुख्यमंत्र्यांसोबत आलेला सुरक्षारक्षकांचा ताफाही जमिनीवरच बसला. महापूजा दिसणार नाही म्हणून आदित्य ठाकरेंना पुढे येऊन बसण्यास सांगितले.

“सर्वच जमिनीवर बसलेत मीही बसतो” :- “मी खाली बसतो, काही अडचण नाही. खुर्ची नको, ती बाजूला ठेवूयात. मागचे बाकीचे सर्वच जमिनीवर बसलेत मीही बसतो,” असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जमिनीवर बसकण मारली.

“हो साहेब बसू शकता” असं ठाकरे यांना म्हणाले. त्यासोबत मुख्यमंत्री क्षणाचाही विलंब न लावता थेट जमिनीवर बसले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कृतीतून त्यांचा साधेपणा दिसून आल्याची चर्चा आहे.

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker