एक कोटींहून अधिक नागरिकांना कोरोनाचे दोन्ही डोस

MHLive24 टीम, 27 जुलै 2021 :- संपूर्ण देशात एक कोटीहून अधिक नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्याचा विक्रम महाराष्ट्राने आज स्वत:च्या नावावर नोंदविला. दोन्ही डोस देऊन एक कोटीहून अधिक नागरिकांचे कोरोनापासून संरक्षण करण्याकामी आरोग्य विभागाने केलेल्या प्रयत्नांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कौतुक केले आहे.

लसीकरणामध्ये नवनवीन विक्रम :- कोरोना विरुद्धच्या लढाईत महाराष्ट्रात एक कोटीहून अधिक नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देऊन त्यांना संपूर्ण संरक्षण देण्यात आले असून आज सायंकाळी चार वाजेपर्यंत राज्यात दिवसभरात सुमारे पावणेचार लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून दोन्ही डोस देण्यात आलेल्या नागरिकांची संख्या एक कोटी 64 हजार 308 एवढी झाली आहे. लसीकरणामध्ये नवनवीन विक्रम महाराष्ट्राच्या नावावर नोंदविले जात आहे.

सव्वातीन कोटींना पहिला डोस :- आतापर्यंत राज्यातील तीन कोटी 16 लाख 9 हजार 227 नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. आज सुरू असलेल्या लसीकरणामुळे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांच्या संख्येचा एक कोटीचा टप्पा पार झाला, असे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी सांगितले.

Advertisement

पुढील महिन्यात लहान मुलांसाठी लस :- केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, झायडस कॅडिलाची लस येत्या ऑगस्टमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या कंपनीने गेल्या एक जुलैला याबाबतची माहिती दिली होती. झायडस कॅडिलानं 12 ते 18 वर्षे वयोगटातील डीएनएवर आधारित असलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक लस झायतो व्ही डीची निर्मिती केली आहे.

या लसीच्या क्लिनिकल ट्रायल नुकत्याच पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे पुढील 45 ते 60 दिवसांत ही लस उपलब्ध होईल. ही लस भारतीय औषध महानियंत्रकांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आली आहे.

तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सचिव सत्येंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘झायडस कॅडिलानं 12 ते 18 वर्षे वयोगटातील लसीची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. या लसीला लवकरच परवानगी दिली जाणार आहे. त्यानुसार 12 ते 18 वर्षे वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरणाला लवकरच सुरुवात होईल.

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker