Bond Investment : गुंतवणुकीसाठी बॉण्ड्सदेखील आहे सर्वोत्तम पर्याय; जाणून घ्या सविस्तर मार्गदर्शन

MHLive24 टीम, 29 सप्टेंबर 2021 :- आपण गुंतवणूक म्हटली की, अगदी परंपरागत साधनांकडे आपसूकपणे वळत असतो. बँक-पोस्ट ऑफिसपलीकडे काही असते हे पूर्वी तर फारच कमी लोकांना ठावूक असायचे, पण काळाच्या ओघात शेअरबाजार, सोने, रिअल इस्टेट असे अनेक मार्ग उपलब्ध असल्याचे जाणवत गेले.(Bond Investment)

गेल्या काही महिन्यांत बँक एफडीवरील व्याजदर खाली आले आहेत. अशा परिस्थितीत मोठ्या संख्येने गुंतवणूकदार आता बाँडकडे मार्गक्रमण करू लागले आहेत.

पूर्वीच्या तुलनेत बरेच लोक बाँडमध्ये गुंतवणूक करण्यावर भर देत आहेत. आपण बाँडमध्ये गुंतवणूक करणार असाल तर गुंतवणूक करण्यापूर्वी काही खास गोष्टी जाणून घेणे महत्वाचे आहे.

Advertisement

बॉण्ड म्हणजे काय ?

बॉण्ड्स हे कंपनी आणि सरकारसाठी पैसे उभे करण्याचे एक साधन आहे. बॉण्ड्समधून जमा केलेले पैसे कर्जाच्या श्रेणीत येतात. आपला व्यवसाय विस्तृत करण्यासाठी कंपनी ठराविक कालावधीत बॉंडमधून पैसे गोळा करते. सरकारही उत्पन्न आणि खर्चाचे अंतर कमी करण्यासाठी कर्ज घेते. ते ही हे कर्ज बॉन्ड रूपातच घेते. जर गुंतवणूकदाराच्या दृष्टीकोनातून पाहिले गेले तर हे बाँड अतिशय सुरक्षित मानले जातात.

बाँड कोण जारी करते ते जाणून घ्या 

Advertisement

हे बाँड प्रामुख्याने केंद्र सरकार, राज्य सरकारे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा कंपन्या जारी करतात. ते आपला नियमित खर्च भागविण्यासाठी किंवा विकास योजना पूर्ण करण्यासाठी बॉण्डच्या माध्यमातून पैसे गोळा करतात. आपण बॉण्ड गुंतवणूकीचा विचार करीत असल्यास, या बाँड्सशी संबंधित या शब्दांचा अर्थ आधीच समजून घ्या.

१) फेस वैल्यू : ही ती व्हॅल्यू असते ज्यावर बॉन्ड दिले जातात. साधारणत: बॉण्डची दर्शनी किंमत 1000 रुपये असते.

२)कूपन रेट : आपण यास पूर्वनिर्धारित व्याज दर म्हणून विचार करू शकता, म्हणजेच, वार्षिक दर ज्यावर आपल्याला बॉण्डमधून उत्पन्न मिळेल.

Advertisement

३) परिपक्वता : हा कालावधी म्हणजे ज्या काळासाठी बाँड जारी केला जातो, म्हणजेच मुदतीनंतर बाँड जारीकर्ता आपल्याकडून आपला बॉण्ड काढून घेईल आणि आपल्याला त्या बंडाचे मूल्य परत करेल.

जाणून घ्या बॉण्डचे प्रकार 

सुरक्षित बॉण्ड

Advertisement

असुरक्षित बॉण्ड

अनिश्चित बॉण्ड

कर मुक्त बॉण्ड

Advertisement

मुख्य असे तीन जोखीम प्रकार असतात 

1) उत्पन्न जोखीम – रोखे निर्माण करणारी कंपनी किंवा बँक यांच्या उत्पन्नाचे मार्ग कोणते व कसे आहेत? त्याचे भवितव्य काय? असे अनेक प्रश्न यात गुंतलेले असतात.

2) पत-जोखीम – मुळात कंपनी वा बँक यांच्याबद्दल काय पत आहे? त्याचा कारभार कशारीतीने होतो हे पाहिले जाते. व्यवस्थापन कसे आहे? कोण मंडळी आहेत? त्यांची पार्श्वभूमी व इतिहास पाहिला जातो.

Advertisement

3) रोकडसुलभता जोखीम-जेव्हा गरज लागेल तेव्हा चटदिशी पैसा मिळू शकतो का? बाँड बाजारात विकून किती झटकन पैसे मिळतील? यालाच रोकडसुलभता असे म्हणतात.

वाईज फिनसर्व्हचे झोनल मॅनेजर पवनकुमार सिंग यांच्या मते बॉण्ड्समध्ये गुंतवणूक करताना एखाद्याने त्यांच्या गरजा व मुदतीनुसार चांगल्या दर्जाचे व सुरक्षित बाँडमध्ये गुंतवणूक करावी. बॉन्डमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवले जातात, म्हणून आपण त्या निवडीमध्ये आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा.

 

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker