Mhlive24 टीम, 23 ऑक्टोबर 2020 :-सध्या बिहारमध्ये निवडणुकीचा धुराळा उडाला आहे. अनेक आरोप प्रत्यारोप चालूच आहेत. भाजपनेही आपल्यावतीने विविध आश्वासने देण्यास सुरुवात केली आहे. परंतु यातीलच एक आश्वासनावरून भाजपाला कोंडीत पकडण्याचे काम विरोधी पक्षाने सुरु केले आहे.

भाजपने नुकतेच बिहारमध्ये भाजपाची सत्ता आल्यास मोफत कोरोना लस देण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात दिले आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजप पूर्णपणे अडकत असल्याचे दिसून येत आहे. विरोधी पक्षांनी या दाव्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

समाजवादी पार्टी, काँग्रेस, सीपीआयसह दुसऱ्या दलांनी भाजपवर निशाना साधला. यावेळी ते म्हणाले की, भाजप कोरोनाचे राजकारण करीत आहे. अखिलेश म्हणाले की, भाजप हे वचन उत्तर प्रदेश आणि दुसऱ्या राज्यातील नागरिकांना का देत नाही.

तर काँग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की, भाजप बिहारमधील जनतेच्या भावनांशी खेळत आहे. अखिलेश यांनी ट्विट केलं की, ‘आज देशाच्या सत्ताधारी भाजपने बिहार निवडणुकीत आपल्या घोषणापत्रात म्हटले आहे की,

ते बिहारच्या लोकांसाठी कोरोना लस मोफत उपलब्ध करणार आहे. अशी घोषणा यूपी आणि अन्य राज्यांसाठी का केली जात नाही. तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ‘भाजपाने कोरोना लसीचेही राजकारण केले आहे.

सर्व राज्यांना मोफत लस देणे ही केंद्र सरकारची जबाबदारी असताना निवडणुका आहेत म्हणून फक्त बिहारला मोफत लस देणार, मग महाराष्ट्रात निवडणुका नाहीत म्हणून त्यांना कोरोनावरील लस देणार नाही का? केंद्र सरकार गोरगरिबांकडून कोरोना लसीचे पैसे घेणार आहे का?’ असे प्रश्न उपस्थित केले आहेत.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology