Big news : मोठी बातमी : ‘ह्या’ बँकेवर आरबीआयची कारवाई, पैसे काढण्यावर देखील प्रतिबंध; तुमचे खाते तर यात नाही ना? पहा

MHLive24 टीम, 09 नोव्हेंबर 2021 :- रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) आणखी एका बँकेवर कडक कारवाई केली आहे. यामुळे या बँकेचे ग्राहक यापुढे त्यांचे संपूर्ण पैसे काढू शकणार नाहीत. ही महाराष्ट्रामधील बँक बाबाजी दाते महिला सहकारी बँक आहे.(Big news )

RBI ने या बँकेवर व्यवसाय निर्बंध लादले आहेत. त्याचबरोबर आता या बँकेच्या ग्राहकांना 5,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही.

त्याचवेळी दोन आठवड्यांपूर्वी आरबीआयने काही सूचनांचे पालन न केल्याबद्दल महाराष्ट्रातील वसई विकास सहकारी बँकेला 90 लाख रुपयांचा दंडही ठोठावला होता. याशिवाय आरबीआयने मुंबईच्या अपना सहकारी बँकेला एका महिन्यासाठी 79 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

Advertisement

गेल्या काही दिवसांपासून आरबीआय सहकारी बँकांविरोधात कठोर धोरण अवलंबत आहे. त्याअंतर्गतच बाबाजी दाते महिला सहकारी बँकेवर कारवाई करण्यात आली आहे. आरबीआयने म्हटले आहे की, हे निर्बंध लागू झाल्यानंतर बँक 8 नोव्हेंबर 2021 चे कामकाज संपल्यानंतर कोणतेही नवीन लोन जारी करू शकणार नाही.

तसेच, या बँकेला आरबीआयच्या परवानगीशिवाय कोणत्याही ठेवी स्विकारता येणार नाही. याशिवाय, या बँकेच्या ठेवीदारांना त्यांच्या खात्यातून 5000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही.

बँक परवाना रद्द झालेला नाही

Advertisement

याशिवाय आरबीआयने हे देखील स्पष्ट केले आहे की त्यांच्या निर्बंधांना बँकिंग परवाना रद्द म्हणून पाहिले जाऊ नये. आरबीआयने म्हटले आहे की, बँकेचे आर्थिक आरोग्य सुधारेपर्यंत बँक निर्बंधांसह बँकिंग व्यवसाय सुरू ठेवू शकते. त्याच वेळी, रिझर्व्ह बँक परिस्थितीनुसार वेळोवेळी या सूचनांमध्ये सुधारणा करू शकते.

हे निर्बंध किती काळ लागू राहणार?

RBI ने सांगितले की 8 नोव्हेंबर 2021 रोजी बँकेचा व्यवसाय बंद झाल्यानंतर हे निर्बंध लागू झाले आहेत. त्याचबरोबर हे निर्बंध पुढील 6 महिन्यांसाठी लागू करण्यात आले आहेत. या कालावधीत बँकेने चांगली प्रगती दाखवल्यास हे निर्बंधही शिथिल करता येतील.

Advertisement

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker