Mhlive24 टीम, 23 ऑक्टोबर 2020 :-  राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला.

त्यानंतर जनतेला संबोधित करताना त्यांनी 10 हजार कोटी रुपयांचं पॅकेज शेतीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी जाहीर केलं आहे.

राज्यात परतीच्या पावसाने अतिवृष्टी झाली असून शेतकऱ्यांच हातातोंडाशी आलेलं पीक मातीमोल झालं आहे.

शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला असतानाच राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मोठा दिलासा दिला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील काही महत्वाचे मुद्दे :-

  • शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी दहा हजार रुपयांची मदत.
  • फळबागांसाठी प्रतिहेक्टरी 25 हजार रुपये.
  • रस्ते,पुलांसाठी 2635 कोटी रुपयांची तरतूद.
  • नगरविकासासाठी 300 कोटी रुपयांची तरतूद.
  • महावितरण ऊर्जासाठी 239 कोटी रुपयांची तरतूद.
  • जलसंपदा विकासनिधीसाठी 102 कोटींची तरतूद .
  • ग्रामीण रस्ते आणि पाणीपुरवठ्यासाठी 1000 कोटींची तरतूद.
  • कृषी शेती आणि घरासाठी 5500 कोटींची तरतूद.

साधारणपणे दिवाळीपर्यंत ही मदत देणार असून शेतकाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू ठेवणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology