Best Offers Infinix's new smartphone is getting a discount
Best Offers Infinix's new smartphone is getting a discount

Best Offers :  Infinix ने गेल्या आठवड्यात भारतात आपला नवीन स्मार्टफोन Infinix Note 12 Pro 4G लॉन्च केला आहे . 108 मेगापिक्सेल मुख्य कॅमेरा असलेल्या या फोनची आज पहिली विक्री आहे.

दुपारी 12 वाजल्यापासून फ्लिपकार्टवर (Flipkart) फोन विक्री सुरु झाली आहे. 8 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत 16,999 रुपये आहे.

खास गोष्ट म्हणजे कंपनी पहिल्या सेलमध्ये युजर्सना सर्व डेबिट आणि क्रेडिट कार्डवर 1500 रुपयांची सूट देत आहे. याशिवाय तुम्ही Flipkart Axis Bank कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला 5% कॅशबॅक देखील मिळेल. इतकेच नाही तर हा फोन खरेदी करणाऱ्या युजर्सना 1,099 रुपयांचा Snoker XE 18 TWS इयरबड्स (Snoker XE 18 TWS earbuds) फक्त 1 रुपयात मिळणार आहे.

Infinix Note 12 Pro 4G ची फीचर्स आणि डिटेल्स 
कंपनी फोनमध्ये 6.7-इंचाचा फुल एचडी + एमोलेड डिस्प्ले देत आहे. फोनमध्ये दिलेला हा डिस्प्ले टियरड्रॉप नॉच डिझाइनसह (Teardrop Notch design) येतो.

या फोनमध्ये गोरिला ग्लास 3 प्रोटेक्शन देखील दिले गेले आहे ज्याची पीक ब्राइटनेस 1000 निट्स पर्यंत आहे. Infinix च्या या फोनमध्ये तुम्हाला 8 GB रॅम आणि 256 GB इंटरनल मेमरी मिळेल. कंपनी फोनमध्ये 5 जीबी व्हर्च्युअल रॅम देखील देत आहे, ज्यामुळे फोनची रॅम गरज पडल्यास 13 जीबी होईल.

फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे देण्यात आले आहेत. यामध्ये 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आणि AI लेन्ससह 108-मेगापिक्सेल मुख्य लेन्सचा समावेश आहे. त्याच वेळी, फोनमध्ये दिलेला सेल्फी कॅमेरा 16 मेगापिक्सेलचा आहे.

साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज असलेल्या या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे. ही बॅटरी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. ड्युअल स्पीकर आणि DTS सराउंड साउंड सपोर्ट असलेला हा फोन Android 12 वर आधारित XOS 10.6 वर काम करतो.