file photo

Mhlive24 टीम, 23 ऑक्टोबर 2020 :-  कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होताना दिसत आहे. अनलॉक प्रक्रियेत राज्यातील जनजीवन हळूहळू रुळावर येत आहे. यादरम्यान जिम उद्योगही सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे.

त्यानुसार २५ ऑक्टोबर म्हणजेच येत्या रविवारपासून राज्यातील जिम सुरू होणार आहेत. आज जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा यांच्या प्रतिनिधींशी उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधला. यावेळी ठाकरे म्हणाले,

कोरोना प्रतिबंधात्मक आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी ‘एसओपी’चे काटेकोर पालन जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा याठिकाणी करण्यात यावे. स्टिम बाथ, सौना, शॉवर आणि झुम्बा, योगा असे सामुहिक व्यायाम प्रकार एसओपीतील निर्देशानुसार पूर्णपणे बंद राहतील.

मार्गदर्शक सूचना :

  • व्यायामासाठी येणाऱ्या सदस्यांना मार्गदर्शक सूचनांची पूर्णपणे माहिती देणे अपेक्षीत आहे.
  • व्यायाम शाळेच्या वेळा, तसेच मर्यादित संख्येत प्रवेश देणे.
  • प्रशिक्षक, अन्य व्यवस्थापकीय अधिकारी यांची वारंवार आरोग्य तपासणी करावी.
  • शारिरीक अंतर, हातांची स्वच्छता आणि मास्क वापरणे या नियमित गोष्टी बरोबरच, क्षेत्रफळांनुसार जास्तीत जास्त सुरक्षित शारिरिक अंतर राखणे.
  • व्यायामशाळेचे दर तासाला निर्जंतुकीकरण करणे.
  • उपकरणांमध्ये अंतर ठेवणे, वापरानंतर त्यांचे निर्जंतुकीकरण करणे.
  • दररोज रात्री जिम, व्यायामशाळा बंद झाल्यानंतर पुर्णपणे निर्जंतुकीकरण करणे.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology