Careful when selling gold : सोने विकताना सावधान! आजपासून लागू झाला मोदी सरकारचा कायदा; ‘ही’ चूक कराल तर तुरुंगात जाल

MHLive24 टीम, 02 डिसेंबर 2021 :- सोने हि भारतीयांची भारी हौस. कोणतेही सण-उत्सव असो कि शुभ कार्य असो सोने खरेदी केली जातेच. यामुळे सोने व्यापाऱ्यांची देखील ‘चांदी’ होते. परंतु आता मोदी सरकारने आणलेला कायदा ‘नवीन ग्राहक संरक्षण कायदा 2019 ‘ लागू करण्यात आला आहे.(Careful when selling gold)

आता यामुळे सोने व्यापाऱ्यांवर चिंता करण्याची वेळ आली आहे. यानुसार आता देशातील 256 शहरांमध्ये हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकण्यावर आता कारवाई सुरू झाली आहे. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) ने हॉलमार्क नसलेल्या सोन्याचे दागिने बाळगणाऱ्यांवर कडक कारवाई सुरू केली आहे.

या कायद्याच्या आधारे जर एखाद्या दागिने विक्रेत्याने हॉलमार्क नसेलेले दागिने विक्री केल्यास त्याच्यावर भारतीय मानक ब्युरो कडून कारवाई करण्यात येणार आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने या वर्षीच्या 16 जूनपासून देशातील 256 शहरामध्ये हॉलमार्क असलेल्या दागिन्यांची विक्री करणे बंधनकारक केलं होतं.

Advertisement

त्यामध्ये 30 नोव्हेंबरपर्यंत जुन्या दागिन्यांची हॉलमार्क नोंद करण्यासाठी मुदत दिली होती. आता याचा अवधी संपला असल्याने ही कारवाई करण्यात येणार आहे.

आता या नवीन नियमानुसार 22 कॅरेट सोने असल्याचे भासवून 18 कॅरेट सोने विकल्यास ज्वेलर्सवर चांगलीच कारवाई होऊ शकते. यासाठी त्याला दंड आणि तुरुंगवास देखील होऊ शकतो. ग्राहकांची होणारी फसवणूक पाहता केंद्र सरकारने गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी नवे कायदे आणलेत.

सोन्याचे दागिने आणि कलाकृतींसाठी हॉलमार्क प्रणालीही देशात लागू करण्यात आली आहे. नवीन ग्राहक कायदा लागू झाल्यानंतर आता हॉलमार्किंगचे नियम पाळणे अधिक कडक होणार आहे.

Advertisement

सोनं जितकं जास्त कॅरेटचं तितकी त्याची गुणवत्ता चांगली. त्यामुळे त्याची किंमतही वाढत जाते. हॉलमार्क असणे ही सरकारी गॅरंटी असून ग्राहकांनी सोने खरेदी करताना त्यावर हॉलमार्क चिन्ह आहे का याची तपासणी करावी आणि त्याची खरेदी करावी असं आवाहन केंद्रीय ग्राहक मंत्रालयाच्या वतीनं करण्यात आलं आहे.

सोन्याचे दर कसे ठरविले जातात ?

1 कॅरेट सोन्याचा अर्थ म्हणजे 1/24 टक्के सोने, जर आपले दागिने 22 कॅरेटचे असतील तर 22 ला 24 ने विभाजित करा आणि ते 100 ने गुणाकार करा. (२२/२)) x100 = 91.66 म्हणजेच आपल्या दागिन्यांमध्ये वापरलेल्या सोन्याची शुद्धता 91.66 टक्के आहे. टीव्हीवर असणारा दर 24 कॅरेट सोन्याचा असतो.

Advertisement

समजा सोन्याची किंमत 50000 रुपये आहे. बाजारात सोनं खरेदी करताना हे लक्षात ठेवा की बाजारात 22 कॅरेट्स सोने मिळतील. म्हणजे 22 कॅरेट सोन्याची किंमत (50000/24) x22 = 45,833.33 रुपये असेल. त्याच वेळी, ज्वेलर आपल्याला 50000 रुपयांत 22 कॅरेट सोने देईल.

म्हणजे आपण 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीवर 22 कॅरेट सोनं विकत घेत आहात. त्याचप्रमाणे 18 कॅरेट सोन्याची किंमतही निश्चित केली जाईल. (50000/24) x18 = 37,500 तर हे दागिने ऑफरसह सोने देऊन फसवणूक करतात.

मेकिंग चार्जसह 3 टक्के जीएसटी

Advertisement

यानंतर मेकिंग चार्ज जोडला जाईल. हे दागिन्यांची रचना कशी आहे यावर अवलंबून आहे. मेकिंग चार्ज 2 टक्के ते 20 टक्क्यांपर्यंत असू शकतो. सरकारकडून मेकिंग शुल्काबाबत कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली नाहीत. ज्वेलर्स त्यांच्या किंमतीनुसार हे ठरवतात.

या नंतर जीएसटी देखील भरावा लागेल, जो ३ टक्के आहे. खरे सोने केवळ 24 कॅरेटचे असते, परंतु त्यापासून कोणतेही दागिने तयार होऊ शकत नाही, कारण ते खूप मऊ असते. दागिन्यांसाठी 22 कॅरेटचे सोने वापरले जातात, त्यात 91.66 टक्के सोने आहे.

सोने खरेदी करताना ‘हे’ लक्षात ठेवा

Advertisement

सराफाने सांगितलेली सोन्याची किंमत त्याच्या गुणवत्तेवर ठरते. उदाहरणार्थ, जर २४ कॅरेट सोन्याची किंमत १० ग्रॅमसाठी ३२ हजार रुपये असेल, तर २२ कॅरेट सोन्याची किंमत त्यापेक्षा कमी असेल, म्हणजे साधारण २९,३०० ते २९,५०० रुपये प्रति १० ग्रॅम असेल. म्हणून तुम्ही जेव्हा दागिन्यांची निवड करता, तेव्हा त्या गुणवत्तेच्या सोन्याची बाजारपेठेतील किंमत तपासून पहा.

अलीकडे दागिन्यांमध्ये हिरे, सेमी-प्रेसिअस खडे आणि कृत्रिम रंग दिलेले खडे जडवूनच मिळतात. हे खडेसुद्धा तुम्ही खरेदी करणार असलेल्या दागिन्यांचाच हिस्सा असतो. सराफाने सोन्याची आणि जडवलेल्या खड्यांची किंमत वेगवेगळी दर्शविणे महत्त्वाचे असते आणि त्यानुसार घडणावळ आणि कर यांचा हिशेब केला गेला पाहिजे.

काही सराफ दागिन्यांचे एकूण वजन हे वास्तविक वजन म्हणून लक्षात घेतात आणि त्यानुसार किंमत लावतात. अशा वेळी चुकीच्या हिशोबामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. उदाहरणार्थ, जर सोन्याचे वजन (प्रतिग्रॅम ३ हजार) २० ग्रॅम असेल आणि खड्याचे वजन (प्रतिग्रॅम २० रुपये) १ ग्रॅम असेल, तर सराफ तुम्हाला ३ हजार x २१ ग्रॅम = ६३ हजार रुपये किंमत लावतो.

Advertisement

पण याचा योग्य हिशोब असा असेल – रु. ३ हजार x २० ग्रॅम + (रु.२० x १ ग्रॅम) = ६०,०२० (लागू असलेल्या दरानुसार जीएसटी अतिरिक्त). म्हणून बिलाची पद्धत तपासून तुम्ही सहजपणे रु.२,९८० रुपये वाचवू शकता.

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker