Mhlive24.com
Maharashtra Live News Updates in Marathi

सावधान! राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

Mhlive24 टीम, 12 डिसेंबर 2020 :अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पुढच्या दोन दिवसात महाराष्ट्रातील काही भागांमध्ये गारपीट तर काही भागांमध्ये हलक्या सरींची शक्यता आहे.

Advertisement

पुढच्या दोन दिवसात खान्देशातील धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव या जिल्ह्यांमध्ये गारपीट पडण्याची शक्यता आहे. याशिवाय उत्तर कोकणात हलक्या पावसाच्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Advertisement

पुढचे ४८ तास राज्यातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील वातावरण ढगाळ आहे. त्यामुळे पुन्हा पाऊसाची दाट शक्यता आहे.

Advertisement

११ ते १५ डिसेंबर दरम्यान मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उपनगर, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग इथे रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर १३ ते १५ डिसेंबर दरम्यान पुन्हा रिमझिम पाऊस आणि ढगाळ वातावरण राहणार आहे.

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement
li