मुळातच कमी बजेटमध्ये येणाऱ्या ‘ह्या’ शानदार कारवर मिळतिये 70 हजार रुपयांपर्यंत सूट; जाणून घ्या ऑफर

MHLive24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :- भारतातील कार क्षेत्रात 7 सीटर कारची मागणी झपाट्याने वाढली आहे, हे लक्षात घेऊन सर्व वाहन उत्पादकांनी त्यांच्या 7 सीटर कार लाँच केल्या आहेत किंवा सध्याच्या कारवर आकर्षक ऑफर देत आहेत. ज्यामध्ये भारतातील प्रमुख फ्रेंच वाहन निर्माता रेनोने आपल्या 7 सीटर कार ट्रायबरवर बंपर सवलत जाहीर केली आहे. ज्यात कंपनी या कारवर 70 हजार रुपयांची सूट देत आहे.

या डिस्काउंटमध्ये कंपनी 25,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 10,000 रुपयांचा लॉयल्टी बोनस आणि 35,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त रोख लाभ देत आहे. रेनो ट्रायबरवर 70 हजार रुपयांची सूट महाराष्ट्र, केरळ, गुजरात आणि गोवा येथे दिली जाईल. इतर राज्यांमध्ये ही सवलत 70 हजारांऐवजी फक्त 60 हजार रुपयांपर्यंत दिली जाईल. जे संपूर्ण ऑगस्ट महिन्यात लागू होईल.

या कारवर उपलब्ध असलेल्या सवलतीची संपूर्ण माहिती जाणून घेतल्यानंतर तुम्हाला या कारची किंमत, वैशिष्ट्ये आणि स्पेसिफिकेशनची संपूर्ण माहिती मिळेल. जेणेकरून कार खरेदी करताना ते तुमच्यासाठी खूप सोपे होईल. रेनो ट्रायबर ही त्याच्या कंपनीची सर्वात स्वस्त 7 सीटर कार आहे, जी कंपनीने 9 व्हेरिएंटमध्ये लाँच केली आहे.

Advertisement

कारमध्ये 999 सीसीचे इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 71 bhp ची पॉवर आणि 96 Nm चा टॉर्क जनरेट करते. या इंजिनसह ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात आले आहे. कारच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ट्रायबरमध्ये 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे जी अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोशी जोडली जाईल.

याशिवाय, हाइट एडजस्टेबल ड्राइवर सीट, दुसऱ्या आणि तिसऱ्या सीटच्या रॉ साठी एसी व्हेंट्स, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, पुश बटण स्टार्ट-स्टॉप, सारखी सुविधा देण्यात आली आहे. पॉवर स्टीयरिंग, वॉर विंडो, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम, एअर कंडिशन, फ्रंट सीटवर ड्युअल एअरबॅग्स, 15 इंचाचे अलॉय व्हील्स अशी फीचर्स देण्यात आली आहेत.

रेनॉल्ट ट्रायबरच्या तिसऱ्या लाइन मध्ये डिटैचेबल सीट्सचा पर्याय देण्यात आला आहे. जे आपल्या गरजेनुसार दुमडले आणि उलगडले जाऊ शकते. कारच्या मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की ही कार 18.2 किमी ते 20.0 किमी पर्यंत मायलेज देते. कारची सुरुवातीची किंमत 5.50 लाख रुपये आहे जी टॉप मॉडेलमध्ये 7.95 लाख रुपयांपर्यंत जाते.

Advertisement

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker