बारामतीच्या दांपत्याला १६ वर्षांनंतर अपत्यप्राप्ती

MHLive24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :- आई होणं हे कोणत्याही महिलेच्या आयुष्यातील सर्वात सुखाचा क्षण असतो. बारामती येथील एका दांपत्याला १६ वर्षांनंतर अपत्यप्राप्तीचा आनंद मिळाला आहे. वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या मदतीने लक्ष्मीच्या पावलांनी या दांपत्याच्या घरात तिळ्या अवतरल्या आहेत.

टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञानाची मदत :- बारामतीतील एक दाम्पत्याला लग्नानंतर १६ वर्षे त्यांना मूल झाले नाही. अपत्य प्राप्तीसाठी त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. अशातच टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञानाची मदत घेण्याचे ठरले. या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने महिलेला गर्भधारणा झाल्यानंतर सोनोग्राफीच्या तपासणीमध्ये महिलेल्या गर्भाशयाच तीन गर्भ रूजल्याचे लक्षात आले.

बाळांविषयी प्रचंड ओढ :- महिलेचे वय पाहता डॉ. राजेश कोकोरे यांनी त्यांना गर्भपाताचा सल्ला दिला होता; मात्र इतक्या वर्षांनंतर आपल्या गर्भात आपले एक नाही, तर तीन-तीन बाळं वाढत असल्याने या महिलेला व पतीलाही आपल्या होणा-या बाळांविषयी प्रचंड ओढ निर्माण झाली होती. डॉक्टर तुम्ही सांगता तशी काळजी घेऊ; पण आम्हाला आमची तीनही बाळं हवी आहेत, असा निश्चय या दांपत्याने डॉ. कोकरे यांच्याकडे व्यक्त केला.

Advertisement

गर्भातल्या तीन पणत्या कायम :- डॉ. कोकरे सांगतात, त्यांचा निश्चय पाहून मी आणि आमच्या स्टाफनेही ‘अपेक्षांनी भरलेलं हे आईपणाचं सुंदर ओझं अतीव व काळजीनं सांभाळायचं’ असं ठरवलं. या भगिनीची अत्यंत मायेने एका माहेरवाशिनीची काळजी घ्यावी तशी काळजी,देखभाल आम्ही आणि आमचा घेत होतो. सातव्या महिन्यामध्ये एक दोनदा या महिलेला प्रसूति कळा सुद्धा आल्या. आता काय होतंय. भीतीने जरा दडपण आले होते; परंतु गर्भातल्या तीन पणत्या कायम तेवत ठेवल्या.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker