‘ह्या’ बँकेचे अलर्ट! उद्या ‘ह्या’ वेळेत बंद राहणार बँकिंग सेवा; कोणताही व्यवहार करता येणार नाही

MHLive24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- एसबीआय ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक बँक SBI च्या काही सेवा उद्या म्हणजेच बुधवारी (15 सप्टेंबर) 2 तास बंद राहतील. या काळात एसबीआय ग्राहक कोणतेही व्यवहार करू शकणार नाहीत. भारतीय स्टेट बँकेने ट्विटरवर यासाठी अलर्ट जारी करून ही माहिती दिली आहे.( Banking services will be closed )

बँकेने ही माहिती ट्विट केली आहे :- एसबीआयने ट्विटरवर एक अलर्ट जारी करत म्हटले आहे की, प्रणालीच्या देखभालीमुळे 15 सप्टेंबरला बँकेच्या काही सेवा बंद राहतील. या सेवांमध्ये इंटरनेट बँकिंग, योनो, योनो लाइट आणि यूपीआय सेवा समाविष्ट असतील.

एसबीआयने एका ट्विटद्वारे म्हटले आहे की, 15 सप्टेंबरच्या रात्री 12 ते 2 वाजेपर्यंत (120 मिनिटे) या सेवा उपलब्ध होणार नाहीत. या काळात ग्राहकांनी कोणत्याही प्लॅटफॉर्मवर व्यवहारांसह इतर उपक्रम टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

Advertisement

बँकेच्या सेवा पूर्वीही विस्कळीत झाल्या होत्या :- यापूर्वी 04 सप्टेंबर रोजी देखभालीच्या कामामुळे एसबीआयची YONO सेवा सुमारे 3 तास बंद होती. याशिवाय जुलै आणि ऑगस्ट महिन्यात देखभाल केल्यामुळे एसबीआयने बँकिंग सेवा बंद केली होती. सहसा देखभाल काम रात्री केले जाते, त्यामुळे ग्राहक प्रभावित होत नाहीत.

देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक :- एसबीआयची इंटरनेट बँकिंग सेवा 8 कोटींपेक्षा अधिक लोक वापरतात आणि मोबाईल बँकिंगचा वापर सुमारे 2 कोटींपेक्षा जास्त लोक करतात. त्याच वेळी, योनोवर नोंदणीकृत ग्राहकांची संख्या 3.45 कोटी आहे, ज्यावर दररोज सुमारे 90 लाख ग्राहक लॉग इन करतात.

 

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker