SBI, PNB सह आता ‘ह्या’ सरकारी बँकेने व्याजदर केले कमी, स्वप्नातील घर-कार होईल साकार

MHLive24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- बँक ऑफ बडोदा ने सणासुदीच्या काळात कर्जदारांना मोठा दिलासा दिला आहे. बँकेने होम लोन आणि कार लोनच्या व्याजदरात कपात करण्याची घोषणा केली आहे. याआधी स्टेट बँक ऑफ इंडियाने देखील गृहकर्जावरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.(Reduction in interest rates)

बँक ऑफ बडोदाने होम लोन आणि कार लोन वर आधीच्या दरात 0.25 टक्क्यांची सूट जाहीर केली आहे. बँकेच्या गृह कर्जाचा व्याजदर 6.75 टक्के आणि कार कर्जाचा व्याजदर 7 टक्क्यांपासून सुरू होतो.

बँकेने काय सांगितले ते जाणून घ्या ? :- बँकेने एका निवेदनात म्हटले आहे की, “कर्जाच्या झटपट मंजुरीसाठी ग्राहक बँकेच्या वेबसाईट आणि मोबाईल अॅपवरूनही कर्जासाठी अर्ज करू शकतात. तसेच डोअर स्टेप सेवादेखील उपलब्ध आहे.

Advertisement

बँकेचे महाव्यवस्थापक एच. टी. सोलंकी म्हणाले, “आगामी सणांमध्ये किरकोळ कर्जावरील या ऑफरसह आम्ही आमच्या विद्यमान समर्पित ग्राहकांना उत्सवाची भेट देऊ इच्छितो. यासह आम्ही बँकेत सामील होणाऱ्या नवीन ग्राहकांना घर आणि कार कर्ज घेण्याची आकर्षक संधी देखील देऊ इच्छितो.

पीएनबीने कर्ज स्वस्त केले :- सणांचा हंगाम जवळ येत असताना पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) ग्राहकांना क्रेडिटची उपलब्धता आणि परवड वाढवण्यासाठी फेस्टिवल बोनान्झा ऑफर सुरू केली. उत्सवाच्या ऑफर अंतर्गत, बँक त्याच्या किरकोळ उत्पादनांवरील सर्व सेवा शुल्क/प्रक्रिया शुल्क आणि दस्तऐवजीकरण शुल्क जसे गृह कर्ज, कार कर्ज, मालमत्ता कर्ज, वैयक्तिक कर्ज, पेन्शन कर्ज आणि सुवर्ण कर्ज माफ करेल.

पीएनबी आता गृह कर्जावर 6.80% आणि कार कर्जावर 7.15% पासून आकर्षक व्याजदर देते. बँक जनतेला वैयक्तिक कर्ज 8.95%वर देखील देत आहे, जे उद्योगातील सर्वात कमी आहे. बँकेने आकर्षक व्याजदराने होम लोन टॉप-अप देण्याचेही जाहीर केले आहे. ग्राहक 31 डिसेंबर 2021 पर्यंत देशभरातील कोणत्याही पीएनबी शाखांद्वारे किंवा डिजिटल चॅनेलद्वारे उपलब्ध असलेल्या आकर्षक ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात.

Advertisement

गृहकर्जावर SBI देतंय सवलत :- देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India – SBI) गृहकर्ज घेणाऱ्या ग्राहकांसाठी फेस्टिव्ह ऑफर्सची सुरुवात केली आहे. सणासुदीच्या काळात ग्राहकांना परवडणारे होम लोन घेता यावे, हे या ऑफर्समागदे उद्दिष्ट आहे. एसबीआयने होम लोनवरील व्याजदर कमी केला आहे. यासह SBI ने 6.70 टक्के दराने क्रेडिट स्कोअर लिंक्ड होम लोन देण्याची ऑफर आणली आहे.

यामध्ये क्रेडिट स्कोअरशी संबंधित कर्जाची रक्कम कितीही असू शकते. याआधी 75 लाखांपेक्षा जास्त लोनवर 7.15 टक्के दराने पेमेंट करावे लागत असे. फेस्टिव्ह ऑफर्सना सुरुवात झाल्यानंतर आता कमीतकमी 6.70 टक्के दराने कर्ज मिळवतील. या ऑफरमुळे 45bps ची सेव्हिंग होईल. एकूण मिळून 75 लाखाचे कर्ज 30 वर्षांसाठी घेतले असेल तर जवळपास 8 लाख रुपयांपेक्षा जास्तीची बचत होईल.

एसबीआयने पगारदार आणि वेतन नसलेल्या गृहकर्ज कर्जदारांमधील फरक दूर केला आहे. आतापर्यंत, वेतन नसलेल्या कर्जदारांसाठी व्याज दर पगार वर्ग कर्जदारांपेक्षा 15bps जास्त होता. सणासुदीच्या काळात बाजार सेंटिमेंटना चालना देण्यासाठी बँकेने प्रोसेसिंग फीस (processing fees) देखील पूर्णपणे माफ केली आहे. बँकेने कर्जदारांच्या क्रेडिट स्कोअरवर आधारित व्याजदरात सवलत दिली आहे.

Advertisement

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker