बँकेत नोकरीच्या आमिषाने फसवणूक करणारी टोळी जेरबंद

MHLive24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :-  अॅक्सिस बँकेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून शेकडो तरुण-तरुणींची फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या रॅकेटने अॅक्सिस बँकेत नोकरी लावून देण्याचे अनेकांना प्रलोभन दाखविले होते. या प्रकरणी मुंबईच्या पायधुनी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या आरोपींकडून मोबाईलसह इतर संशयास्पद साहित्य जप्त केले आहे.

दिल्लीवरून चालवायचे रॅकेट :- मिळालेल्या माहितीनुसार अॅक्सिस बँकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून लोकांना फसवणारे एक रॅकेट सक्रिय झाले होते. त्याची माहिती मुंबईच्या पायधुनी पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी कारवाई करण्याचे ठरवले. त्यासाठी पोलिसांनी सापळा रचला. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी मोठ्या शिताफीने तीन आरोपींना ताब्यात घेतलं. हे आरोपी दिल्लीमधून लोकांना फसवायचे.

मोबाईल, एटीएम, डेबिट कार्ड, बँकेचे पासबुक जप्त :- नोकरी लावण्याचे आमिष दाखवून लोकांना लुटणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांनी अतिशय गुप्त पद्धतीने कारवाई केली. या कारवाईमध्ये पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. तसेच या आरोपींकडून अनेक संशयास्पद साहित्य जप्त केले. पोलिसांनी त्यांच्या कारवाईत अनेक मोबाईल, एटीएम, डेबिट कार्ड, बँकेचे पासबुक, आधार कार्ड आणि इतर साहित्य जप्त केले आहे.

Advertisement

आरोपींची कसून चौकशी :- नोकरीचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या अनेक तरुण आणि तरुणींना ही टोळी फसवत होती. नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांकडून ही टोळी पैसे उकळत होती; मात्र पायधुनी पोलिसांनी ही कारवाई केल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. अटक केलेल्या तीन आरोपींची पोलिस कसून चौकशी करत आहेत. त्यांच्या चौकशीतून आणखी धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker