Bank Holidays: डिसेंबरमध्ये तब्बल 16 दिवस बँक बंद; वाचा सुट्ट्यांची संपूर्ण लिस्ट

MHLive24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- नोव्हेंबर महिना संपायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. थोड्याच दिवसांत डिसेम्बर सुरु होईल. या डिसेंबर महिन्यात तुमची बँकेशी संबंधित काही कामे असतीलच. यासाठी बँकेचे नियोजन करण्याआधी बँकेला असणाऱ्या सुट्ट्यांची यादी अवश्य पहा. डिसेम्बर महिन्यात 16 दिवस बँका बंद राहणार आहेत.(Bank Holidays)

16 दिवस बँका बंद राहतील

पुढील महिन्यात, एकूण 16 दिवस सुट्ट्या असतील, ज्यामध्ये 4 सुट्ट्या रविवारी असतील. यातील अनेक सुट्ट्या सलग पडणार आहेत. या महिन्यात ख्रिसमसचा सण येतो, ज्याची सुट्टी देशातील जवळपास सर्व बँकांमध्ये साजरी केली जाते. मात्र, सर्वत्र 16 दिवस बँका बंद राहणार नाहीत. काही सुट्ट्या स्थानिक असल्याने काहीच ठिकाणी बँका बंद राहतील.

Advertisement

आरबीआयने जाहीर केली लिस्ट

आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, रविवार व्यतिरिक्त महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात. येथे आरबीआयच्या डिसेंबर महिन्याच्या यादीसोबत हे देखील सांगण्यात येत आहे की कोणत्या दिवशी बँका कोणत्या राज्यात बंद राहतील आणि कुठे उघड्या राहतील.

या आधारावर तुम्ही तुमच्या बँकेशी संबंधित कामाचा निपटारा ताबडतोब करावा जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येऊ नये.

Advertisement

डिसेंबर 2021 मध्ये बँकेला सुट्ट्या

3 डिसेंबर – फेस्ट ऑफ सेंट फ्रांसिस जेवियर (पणजीत बँका बंद)
5 डिसेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
11 डिसेंबर – शनिवार (महिन्याचा दुसरा शनिवार)
12 डिसेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)

18 डिसेंबर – यू सो सो थामची पुण्यतिथी (शिलाँगमध्ये बँका बंद)
19 डिसेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
24 डिसेंबर – ख्रिसमस सण
25 डिसेंबर – ख्रिसमस (बंगळुरू आणि भुवनेश्वर वगळता सर्व ठिकाणी बँका बंद) शनिवार, (महिन्याचा चौथा शनिवार)

Advertisement

26 डिसेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
27 डिसेंबर – ख्रिसमस सेलिब्रेशन (आयझॉलमध्ये बँका बंद)
30 डिसेंबर – यू कियांग नोंगबाह (शिलॉन्गमध्ये बँका बंद)
31 डिसेंबर – न्यू ईयर्स इवनिंग (आयझॉलमध्ये बँका बंद)

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker