Post Office Service
Post Office Service

Indian Post Payment Bank :आजघडीला सर्वात सुरक्षित गुंतवणूक म्हणून पोस्ट बँकेकडे पाहिले जाते. पोस्ट ऑफीसदेखील आपल्याला भरपूर योजना देऊ करते, ज्यामध्ये सुरक्षिततेसोबत मजबूत फायदादेखील दिला जातो.

वास्तविक इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) च्या खातेदारांसाठी एक वाईट बातमी आहे. IPPB ग्राहकांना 15 जुलै 2022 पासून व्हर्चुअल डेबिट कार्डसाठी वार्षिक देखभाल शुल्क आणि रीइश्युअन्स चार्जेस भरावे लागतील.

बँकेने आपल्या खाते ग्राहकांना डिजिटल पेमेंट इकोसिस्टमकडे वळण्यास मदत करण्यासाठी त्यांचे रुपे व्हर्चुअल डेबिट कार्ड लॉन्च केले आहे.

सरकारकडून डिजिटल पेमेंट इकोसिस्टमला प्रोत्साहन दिले जात आहे. आयपीपीबीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, 15 जुलै 2022 पासून, आभासी डेबिट कार्ड (व्हीडीसी) वर 25 रुपये वार्षिक देखभाल शुल्क (जीएसटीसह) आणि 25 रुपये पुन्हा जारी करण्याचे शुल्क आकारले जाईल.

तथापि, प्रीमियम खातेधारकांना या शुल्कातून सूट दिली जाईल. यापूर्वी आयपीपीबी या अंतर्गत ग्राहकांकडून कोणतेही शुल्क आकारत नव्हते.. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) ही एक सार्वजनिक मर्यादित कॉर्पोरेशन आहे जी पूर्णपणे पोस्ट विभाग, भारत सरकारच्या अंतर्गत येते.

तो दळणवळण मंत्रालयाचा भाग आहे. देशभरात डिजिटल पेमेंट सुधारण्यासाठी, IPPB RuPay व्हर्चुअल डेबिट कार्ड ऑफर करते, ज्यासाठी ग्राहक त्यांच्या IPPB मोबाइल बँकिंग अॅपद्वारे अर्ज करू शकतात.

RuPay कार्ड स्वीकारणाऱ्या भारतातील कोणत्याही व्यापारी वेबसाइट/ऑनलाइन पोर्टलवर ऑनलाइन खरेदी करण्यासाठी कार्डचा वापर केला जाऊ शकतो.

हे डिजिटल डेबिट कार्ड ग्राहक त्यांच्या मोबाइल बँकिंग अॅपवर तयार करू शकतात. हे पारंपारिक प्लास्टिक कार्डसारखे आहे.