MHLive24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :- बाबा रामदेव हे विविध कारणांनी नेहमीच चर्चेत असतात. बाकी काही असले तरी ते त्यांच्या निझनेस शी संबंधित कायम अपडेट राहतात, आता त्यांच्या कंपनीने जवळपास 1000 कोटींचा फायदा गुंतवणूकदारांचा करून दिला आहे. योगगुरू बाबा रामदेव यांच्या मालकीच्या रुचि सोया कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी तेजी आल्याचं पाहायला मिळत आहे. ( Baba Ramdev’s company gave people a benefit)

पाम तेलावरील आयात शुल्क कमी झाल्यानंतर बाबा रामदेव यांच्या रुची सोया च्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली. सोमवारी पतंजली ने विकत घेतलेल्या रुची सोयाचा शेअर बीएसईवर 3 टक्क्यांहून अधिक वाढला. यामुळे गुंतवणूकदारांना खूप फायदा झाला आहे आणि त्यांच्या संपत्तीत 1,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे.

खाद्य तेलाच्या वाढत्या दराला नियंत्रित करण्यासाठी केंद्र सरकारनं पुन्हा एकदा आयात शुल्कात कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. आयात शुल्कात कपात केल्यामुळे देशातील जनतेला खाद्य तेलाच्या खरेदीत दिलासा मिळेल याच हेतूनं सरकारनं हे पाऊल टाकलं.

सीपीओ, पामोलीन, सूरजमुखी, सोयाबीन डीगम आणि सोयाबीन रिफाइंड खाद्य तेलाच्या आयात शुल्कात सरकारनं ५.५ टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत ही कपात करण्यात आली आहे. याचा सामान्य ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे.

रुची सोया 4300 कोटींचा एफपीओ आणणार :- सेबीने रुची सोयाच्या एफपीओला मंजुरी दिली आहे. FPO च्या माध्यमातून 4,300 कोटी रुपये उभारण्याची कंपनीची योजना आहे. पतंजली आयुर्वेदने दिवाळखोर कंपनी रुची सोयाला 2019 मध्ये 4,350 कोटी रुपयांना खरेदी केले होते. अदानी ग्रुप देखील ही कंपनी खरेदी करण्याच्या शर्यतीत सहभागी होता पण नंतर मागे हटण्याचा निर्णय घेतला.

अलीकडेच एका मुलाखतीत बाबा रामदेव म्हणाले की, पतंजलीचा आयपीओ पुढील वर्षी येऊ शकतो. ते म्हणाले, रुची सोयाआधी आम्ही पतंजलीचा आयपीओ सुरू करण्याचा विचार केला नव्हता. पण आता भीती दूर झाली आहे आणि पुढच्या वर्षी ती बाजारात सूचीबद्ध होईल.

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit