Big News : काय सांगता ! योगगुरू बाबा रामदेव आता नेपाळमध्ये सुरू करतायेत ‘असे’ काही; उचलणार मोठे पाऊल

MHLive24 टीम, 19 नोव्हेंबर 2021 :- नेपाळमधील पतंजली आयुर्वेद समूहाच्या दोन टेलीविजन चॅनेल आणि इतर व्यावसायिक प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी योगगुरू बाबा रामदेव गुरुवारी काठमांडू येथे आले होते. पतंजली योगपीठ, नेपाळच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.(Big News )

रामदेवबाबा तीन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर असून त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी आचार्य बाळकृष्णही आहेत. बाबा रामदेव शुक्रवारी आस्था नेपाळ टीव्ही आणि पतंजली नेपाळ टीव्ही लॉन्च करणार आहेत.

पतंजलीच्या कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या पतंजली सेवा सदन व्यतिरिक्त स्वदेशी समृद्धी कार्डचे उद्घाटनही योगगुरू बाबा रामदेव करणार आहेत.

Advertisement

दरम्यान, रामदेव पश्‍चिम नेपाळमधील स्यांगजा येथेही पतंजली आयुर्वेद समूहाद्वारे विकसित करण्यात येत असलेल्या प्रकल्पाची पाहणी करणार आहेत.

आयुर्वेदिक आणि स्वदेशी उत्पादनांमधून पतंजलीचा प्रसार :- योगगुरू बाबा रामदेव यांनी पतंजलीच्या माध्यमातून देशात आयुर्वेदिक आणि स्वदेशी उत्पादनांच्या वापरावर भर दिला. त्यामुळे लोकांमध्ये पतंजलीच्या उत्पादनाकडे कल वाढला होता. लवकरच पतंजलीने एफएमसीजी क्षेत्रात अनेक परदेशी ब्रँड्सना मागे टाकले आणि आपल्या उत्पादनाच्या जोरावर बाजारात वेगळी ओळख निर्माण केली.

2018 साली डेअरी प्रोडक्ट्स लॉन्च झाली :- वर्ष 2018 मध्ये पतंजलीने पहिल्यांदा डेअरी उत्पादने लाँच केली, तेव्हापासून सुनील बन्सल कंपनीशी जोडले गेले होते. पतंजलीच्या डेअरीची सुरुवात दुधापासून झाली, त्यानंतर रामदेव यांनी दही, ताक आणि पनीरही बाजारात आणले.

Advertisement

लॉन्चच्या पुढील आर्थिक वर्षात पतंजलीने 1,000 कोटी रुपयांचे डेअरी उत्पादने विकण्याचे लक्ष्य ठेवले होते. अहवालानुसार, पतंजलीच्या नफ्यात दुग्धजन्य पदार्थांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

2019 मध्ये रुची सोयाचे अधिग्रहण :- जेव्हा पतंजलीची दुग्ध उत्पादने 2018 मध्ये लाँच करण्यात आली होती, त्याच वेळी कंपनी रुची सोयाचे अधिग्रहण करण्यात गुंतलेली होती. रुची सोयाला पतंजलीने 2019 मध्ये विकत घेतले होते. ही कंपनी विकत घेण्यासाठी पतंजलीने 3 हजार कोटींहून अधिक कर्ज घेतले होते. यामध्ये सर्वाधिक कर्ज एसबीआयकडून घेण्यात आले.

पतंजली नफ्यात आहे :- आकडेवारीनुसार, पतंजली आयुर्वेदचा निव्वळ नफा 2019-20 या आर्थिक वर्षात सुमारे 22 टक्क्यांनी वाढून 424.72 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. त्याचवेळी, 2018-19 मध्ये पतंजली आयुर्वेदचा एकूण नफा 349.37 कोटी रुपये होता.

Advertisement

31 मार्च 2020 रोजी संपलेल्या तिमाहीत पतंजलीचा परिचालन महसूल मागील वर्षाच्या तुलनेत 5.86 टक्क्यांनी वाढून 9,022 कोटी रुपये झाला आहे. पतंजली आयुर्वेदचे गेल्या आर्थिक वर्षाचे म्हणजेच 2020-21 चे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत.

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker