Business Idea : मशरूमचा व्यवसाय करून ऑटोवाला बनला करोडपती

MHLive24 टीम, 28 डिसेंबर 2021 :- उत्तर प्रदेशमधील जौनपूरचे रहिवासी असलेले रामचंद्र दुबे हे पूर्वी ऑटो चालवत असत, परंतु गेल्या चार वर्षांपासून शेतकऱ्यांकडून मशरूम विकत घेवून त्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवून त्याचा व्यवसाय त्यांनी सुरु केला. यातून ते लाखोंचा नफा कमवत आहेत.(Business Idea )

2001 च्या मध्यात रामचंद्र दुबे यांनी वृत्तपत्रात ‘जमिनीशिवाय शेती करा आणि महिन्यात लाखो रुपये कमवा’ अशी एक बातमी वाचली. तेव्हा त्यांना असे वाटले की हे मूर्ख लोक आहेत, कंपनीला छापणे शक्य नाही म्हणून त्यांनी जहिरात केली.

पण जेव्हा दुबे या कंपनीला भेटले, तेव्हा त्यांना समजले की, शेतकऱ्याचे जीवन खरोखरच हलकीत आहे. मशरूमची लागवड करूनही ते फायद्यात नव्हते. त्यामुळे या मशरूमची त्यांनी खरेदी करून त्याचा व्यवसाय करायचे असे त्यांनी ठरवले.

Advertisement

मशरूम आणि त्याचे फायदे

रामचंद्र यांच्याकडे मशरूम वाढवण्याचे कोणतेही प्रशिक्षण नव्हते. त्यावेळी रामचंद्र आपल्य कुटुंबाच्या सोबत मुंबईत राहत आणि ऑटो चालवत असत. पॅन मशरूमची लागवड शिकण्यासाठी त्यांनी धडपड सुरु केली.

आणि आज 20 वर्षांनंतर, उत्तर प्रदेशातील मूळ गावात राहून, आपल्या शेतकर्‍यांना मशरूम लागवडीचे प्रशिक्षण देत, त्यांच्याकडून मशरूम विकत घेऊन ते बाजारात पोहोचू शकले.

Advertisement

रामचंद्र 12वीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतरच मुंबईला गेले. तिथे त्यांनी ऑटो चालवली. ते सांगतात की, मी मुंबईला फार संधार्ष केला. कधी झोपलो नाही. मला गिरणीतसुद्धा काम करावं लागत असे. कारण ऑटो चालवणे फार आवडत नव्हते. म्हणून मी नंतर खेडोपाडी राहण्याचा विचार केला.

शेतकरी वर्गाला स्वत: मी स्वतः मदत करेन, असा निर्धार मी केला होता. रिक्षा चालवताना मला आठ तास आपल्या कुटुंबासाठी वेळ मिळवायचा आणि दोन तास लोकाना मदत करायचो. अनेक वर्षांच्या ऑटोच्या व्यवसायानंतर मी ठाण्याला सहकारी संस्था सुरू केली.

त्याअंतर्गत लोकांच्‍याकडून पैसे जमा करायचे आणि त्यांना कर्ज द्यायचे. ते काही काळ ते ठीक चालले. मात्र नंतर काही लोकांनी केलेल्या फसवणुकीमुळे त्यांना हे काम बंद करावे लागले.

Advertisement

2017 मध्ये गावाकडे परतले

रामचंद्र म्हणतात की, जौनपूर जिल्ह्यातील पाचोली गावात जमीन आहे, त्या संदर्भात वारंवार गावात यावे लागत होते. 2017 मध्ये फक्त जमिनीच्या कामासाठी एकदा गावात आले होते. मात्र यावेळी ते दोन-तीन आठवडे गावात राहिल्यानंतर आपल्या जमिनीवर शेती का करू नये, असा विचार त्यांच्या मनात आला.

ते म्‍हणाले, “मला आधुनिक शिक्षण करण्‍याची गरज आहे, महणून मी कृषी तंत्रज्ञान केंद्रापर्यंत पोहोचलो आणि काही प्रश्‍न विचारले . त्त्यांनी मला एक-दोन यशस्वी सेंद्रिय शेतक-यांचे नंबर दिले. मी त्यांना भेटलोही, पण तरीही त्यांचे काम समजले नाही.

Advertisement

लोकांशी चर्चा करून केली मशरूमची शेती

त्यानंतर जुलै 2017 च्या मध्यात पुन्हा एकदा कृषी विज्ञान केंद्राला भेट दिलीत्यावेळी चर्चासत्र सुरू होते. परिसंवाद झाल्यानंतर त्यानी काही पोस्टर दाखवले. या पोस्टर्सपैकी आणखी एक पोस्टर रिकामे होते – मशरूम प्रशिक्षणाचे. “ते पोस्टर बघून मला 17 वर्ष जुनी गोष्ट आठवली.

मी पाच दिवस पूर्ण प्रशिक्षण घेतले होते. प्रशिक्षणाच्या दिवशी एका शेतकऱ्याने प्रश्न विचारला की, तो मशरूम पिकवतो तरी कोण खरेदी करतो? मला आठवले की मुंबईतील कंपनीने सांगितले होते की तुम्ही कोणत्याही प्रदेशात मशरूम वाढवा, आम्ही तुमचे मशरूम सर्वत्र खरेदी करू.

Advertisement

त्यामुळे रामचंद्र यांनी शेतकर्यांचे पिकवलेले मशरूम मार्केटिंगची जबाबदारी घेण्‍याचे आश्‍वासन शेतक-याला दिले. मशरूमची लागवड करणाऱ्या बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी, तर बरे होईल. अशा विचारातून त्यांनी काम सुरु केलं.

अनेक शेतकरी जोडले

सर्वप्रथम, रामचंद्र यांनी काही शेतकऱ्यांची मिटिंग केली, मशरूमचे चांगले प्रशिक्षण दिले, एक शेतकरी अरविंद यादव मशरूम पिकवण्यास तयार होते. बाजार न मिळाल्याने इतर शेतकरी वैतागले होते. पण अरविंदने विश्वास ठेवला नाही आणि ऑयस्टर मशरूम वाढवला. अरविंदसाठीही हा प्रवास सोपा नव्हता.

Advertisement

लोकांनी विरोध केला तरीही 900 रुपयात त्यांनी मशरूम पिकवला. रामचंद्र यांनी त्यांच्याकडून हे मशरूम ३ हजार रुपयांना विकत घेतले. प्रथम ते लोकाना मोफत दिले. नंतर त्यांनी आपल्या मित्राच्या मुलीच्या लग्नात मशरूमची भाजी बनवली ती लोकांना खूप आवडली.

पहिल्या खरेदीतून अरविंदला २१०० रुपयांचा नफा मिळाला आणि इतर शेतकऱ्यांनाही आत्मविश्वास मिळाला. नंतर काही शेतकरी रामचंद्र यांच्यासोबत सामील झाले. रामचंद्र दररोज त्यांच्याकडून 50-60 किलो मशरूम विकत घेवून आणि जौनपूरमध्येच वेगवेगळ्या दुकानात देवू लागला.

 

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker