ऑस्ट्रेलियाला हरवत भारताने रचला नवा इतिहास !

Mhlive24 टीम, 19 जानेवारी 2021:– ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात बॉर्डर गावसकर मालिकेतील चौथा आणि शेवटचा कसोटी सामन्याचा आजचा शेवटचा दिवस भारतासाठी खूपच चांगला ठरला. कांगारुंनी टीम इंडियाला विजयासाठी 328 धावांचे आव्हान दिले होते. भारताने हा सामना जिंकत ऑस्ट्रेलियाला धूळ चारली.
A moment to savour for India! #AUSvIND pic.twitter.com/vSogSJdqIw
Advertisement— cricket.com.au (@cricketcomau) January 19, 2021
Advertisement
सलामीवीर फलंदाज शुबमन गिल (९१), अनुभवी चेतेश्वर पुजारा (५६) आणि तुफानी ऋषभ पंत (८५*) यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारतानं चौथ्या कसोटी सामन्यात तीन गड्यांनी विजय मिळवला आहे.
या विजयासाह भारतानं बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका २-१ नं जिंकली आहे. पहिल्या कसोटी सामन्यातील मानहाणीकारक पराभवानंतर भारतीय संघानं फिनिक्स पक्षाप्रमाणे कसोटी मालिकेवर नाव कोरलं आहे.
पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतानं ८ गड्यानं विजय मिळवला.
तर हनुमा विहारी आणि आर. अश्विन यांनी संयम आणि जिद्दीनं फलंदाजी करत तिसरा कसोटी सामना अनिर्णित राखला. चौथ्या कसोटी सामन्यात सांघिक खेळाच्या बळावर भारतीय संघानं विजय मिळवला.
या मैदानावर आतापर्यंत ऑस्ट्रेलियाचा संघ पराभूत झालेला नव्हता. पंत-पुजारानं संयमी फलंदाजी केल्यास भारतीय संघ हा विक्रम मोडला.
बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेत चेतेश्वर पुजारानं सर्वाधिक २०० पेक्षा जास्त चेंडू खेळण्याचा सुनील गावसकर यांचा विक्रम मोडीत काढला आहे.
पुजारानं नवव्यांदा २०० पेक्षा जास्त चेंडू खेळले आहेत. गावसकर यांनी सातवेळा तर तेंडुलकरनं सहावेळा २०० पेक्षा जास्त चेंडू खेळले आहेत.
📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर
१०० वा कसोटी सामना खेळणाऱ्या नॅथन लायनाविरोधात ऋषभ पंतनं फटकेबाजी केली आहे. पंत-सुंदरनं लायनलाच्या एका षटकांत १५ धावा वसूल करत सामना भारताच्या बाजूनं झुकवला.