Mhlive24 टीम, 23 ऑक्टोबर 2020 :-दरवर्षीप्रमाणे यंदाही हिवाळ्याच्या आगमनाबरोबर राजधानी दिल्लीला भीषण वायू प्रदूषणाचा विळखा पडला आहे.

दिवाळीपूर्वीच राजधानी आणि आसपासची शहरे गॅस चेंबर बनली आहेत. वायू प्रदूषणाची तीव्रता इतकी वाढलेली आहे की, आसमंतात दाटलेल्या धूलिकणांमुळे भर दुपारी अंधारल्याचा भास होतो आहे.

त्यामुळे या ठिकाणी केवळ कोरोनापासून वाचण्यासाठी नव्हे तर प्रदूषणापासून वाचण्यासाठी देखील मास्कचा वापर करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. जे नागरिक मास्क वापरणार नाहीत त्यांच्या आरोग्याला धोका असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

याविषयी माहिती देताना दिल्लीतील सफदरजंग हॉस्पिटलधील रेस्पिरेटरी विभागातील अधिकारी डॉ. नीरज कुमार गुप्‍ता यांनी म्हटले, कोरोनाबरोबरच आता प्रदूषणापासून वाचण्यासाठी देखील मास्क घालणं गरजेचं आहे.

त्यामुळे नागरिक मास्क वापरत नाहीत त्यांच्या आरोग्यावर याचा दुप्पट परिणाम होऊ शकतो. प्रदूषणामुळे आपल्या श्वसननलिकेतील प्रतिरोधक क्षमता कमी होते. त्याचबरोबर काहीवेळा यामध्ये सूज येण्याबरोबरच कोरोना होण्याचा धोका देखील वाढू शकतो.

प्रदूषणामध्ये व्यक्तीला कोरोना झाल्यास त्याला याचा मोठा फटका बसणार असल्याचे देखील गुप्ता म्हणाले. हवेतील श्वसनयोग्य सूक्ष्म कणांची (पीएम 2.5) सुरक्षित मर्यादा दहा ते वीसपटींनी वाढल्याने दरवर्षी 25 ते 30 हजार नागरिक मृत्युमुखी पडतात आणि 25 ते 30 लाख विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्‍यात

येते. दिल्लीकरांना तसेही वर्षभर विविध घटकांमुळे वायू प्रदूषणाचा मारा सहन करावा लागतो. त्यात हरयाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि उत्तराखंडमध्ये खरीप हंगाम संपल्यावर शेतात जाळला जाणाऱ्या कचऱ्यामुळे दरवर्षी दिल्लीच्या वायुमंडलात प्रदूषणाच्या थैमानाची भर पडते आणि नेहमीप्रमाणे केंद्रातील सरकारसह या राज्यांतील राज्यकर्तेही हतबल होतात.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology