Apple is gifting 'those' customers 'This' is a big announcement
Apple is gifting 'those' customers 'This' is a big announcement

Apple :  सध्या जगभरातील लोक नव्या आयफोनची (iPhone) आतुरतेने वाट पाहत आहेत, मात्र त्याआधी अॅपलने (Apple) आपल्या जुन्या आयफोन (old iPhone) आणि आयपॅड (iPads) वापरणाऱ्यांना एक मोठी भेट दिली आहे. 

Apple ने iPhones, iPads आणि iPods चे जुने मॉडेल वापरणाऱ्या ग्राहकांसाठी नवीन iOS 12 बिल्ड जारी केले आहे. नवीन अपडेट सुरक्षिततेच्या त्रुटीच्या निराकरणासह येते ज्यामुळे वेबसाइटला डिव्हाइसवर मेलिशियस प्रोग्राम चालवण्याची परवानगी मिळू शकते. कोणत्या डिव्हाईसला मिळणार नवीन अपडेट आणि काय खास आहे, जाणून घ्या सविस्तर सर्वकाही.

सॉफ्टवेअर अपडेट का आवश्यक आहे?
ऍपलच्या मते, iOS 12 मधील त्रुटीमुळे ‘दुर्भावनापूर्णपणे तयार केलेल्या वेब कंटेंटवर प्रोसेस करणे’ होऊ शकते, ज्यामुळे ‘आरबिट्ररी कोड एक्झिक्यूशन’ होऊ शकते.

याचा अर्थ असा की iOS 12 मधील बग एखाद्या वेबसाइटला Apple डिव्हाइसमध्ये मलिशियस प्रोग्राम चालविण्यास अनुमती देऊ शकतो. iOS 12.5.6 नावाचे नवीनतम अपडेट बिल्ड नंबर 16H71 आणते आणि बगचे निराकरण करते. म्हणून, वापरकर्त्यांना त्यांचे डिव्हाइस अपडेट करण्याचा सल्ला दिला जातो.

कोणते Apple डिवाइस प्रभावित आहेत?
प्रभावित Apple डिवाइसच्या यादीमध्ये iPhones, iPads आणि iPods चा समावेश आहे. नवीनतम iOS अपडेट मिळत असलेल्या डिव्हाइसेसची ही यादी आहे.

Apple iPhone 5s, Apple iPhone 6 , Apple iPhone 6 Plus, Apple iPad Air, Apple iPad mini 2, Apple iPad mini 3 आणि  Apple iPod touch (6th generation)

तुमचा आयफोन आणि आयपॅड कसे अपडेट करावे?

तुम्ही देखील वर नमूद केलेले डिव्हाइस वापरत असल्यास आणि ते iOS 12.5.6 वर अपडेट करायचे असल्यास, या स्टेप्सचे अनुसरण करा

तुमच्या iPhone किंवा iPad वर सेटिंग्ज अॅपवर जा. जनरल ऑप्शनवर जा आणि त्यावर टॅप करा. आता सॉफ्टवेअर अपडेट पर्यायावर टॅप करा. तुमच्या डिव्हाइसवर अपडेट उपलब्ध असल्यास, तुम्ही इंस्टॉल आणि अपडेट पर्याय निवडा आणि त्यावर टॅप करा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ऑन-स्क्रीन सूचनांचे अनुसरण करा.

दरम्यान, अॅपलने 7 सप्टेंबर रोजी आपला ‘फार आऊट’ लॉन्च इव्हेंट जाहीर केला आहे. या इव्हेंटमध्ये कंपनी आपला 2022 आयफोन लाइनअप लॉन्च करू शकते. Apple iPhone 14 सीरिजमध्ये चार फोन समाविष्ट आहेत – iPhone 14, iPhone 14 Max, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max