मोदी सरकारकडून आणखी एक खुशखबर; तुमच्या पगाराबाबत होणार आता ‘असे’ काही

MHLive24 टीम, 30 जुलै 2021 :- कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकार महत्त्वाचा निर्णय घेऊ शकतं. अलीकडे अनेक निर्णयांनी मोदी सरकारे जनतेला खुश केले आहे. आता आणखी एका निर्णयाद्वारे सरकार खुशखबर देण्याच्या तयारीमध्ये आहे. अशी माहिती मिळते आहे की 1 ऑक्टोबरपासून मोदी सरकार लेबर कोडचे नियम लागू करू शकतात.

मीडिया अहवालांच्या मते 1 जुलैपासून सरकार लेबर कोडचे नियम लागू करणार होते, मात्र राज्यांची तयारी नसल्याकारणाने आता 1 ऑक्टोबरपासून हे नियम लागू होऊ शकतात. 1 ऑक्टोबरपासून जर लेबर कोडचे नियम लागू झाले, तर अशी शक्यता आहे कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 15000 रुपयांवरुन वाढून 21000 होऊ शकतो.

कोणते नियम बदलले ते जाणून घ्या ? :- नवीन मसुद्याच्या नियमानुसार, मूळ वेतन एकूण पगाराच्या 50% किंवा अधिक असावे. यामुळे बहुतेक कर्मचाऱ्यांच्या वेतन रचनेत बदल होणार आहे. मूलभूत पगारामध्ये वाढ झाल्यास पीएफ आणि ग्रॅच्युइटीसाठी कपात केलेली रक्कम वाढेल, कारण यात कपात होणारे पैसे मूळ पगाराच्या प्रमाणात आहेत.

Advertisement

संघटनेनं अशी केलीय मागणी :- मोदी सरकारनं हे नियम लागू केल्यास तुमच्या हातात येणारा पगार कमी होईल, निवृत्तीनंतर पीएफ आणि ग्रॅच्युइटीचे पैसे वाढतील. कामगार संघटनेची मागणी अशी होती की, किमान मूलभूत वेतन 21000 रुपये केले पाहिजे, जेणेकरून पीएफ आणि ग्रॅच्युइटीमध्ये पैसे कपात करूनही हातात येणारा पगार कमी होणार नाहीत.

1 ऑक्टोबरपासून कर्मचाऱ्यांसाठी काय बदलणार? :- नव्या वेज कोड नियमानुसार, कंपनीच्या कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी ही CTC च्या 50 टक्के असायला हवी. त्यापेक्षा कमी असू नये असे सांगण्यात आले आहे. सध्या अनेक कंपन्यांमध्ये बसिक सॅलरी कमी आणि इतर वेजेस वाढवून दिले जातात.

मात्र येणाऱ्या नव्या नियमानुसार आता कंपनीला CTCच्या 50 टक्के बेसिक सॅलरी द्यावी लागणार आहे. सध्या वापरण्यात येणारी सिस्टिम पूर्णपणे बदलली जाणार आहे. उर्वरित 50 टक्के सॅलरी ही कर्मचाऱ्यांनी मिळणाऱ्या सर्व भत्त्यांमध्ये ग्राह्य धरण्यात येईल.

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker