मोदी सरकारच्या ‘त्या’ खास सुविधेत मिळू शकते आणखी एक मोठी सुविधा, वाचा अन फायदा घ्या

MHLive24 टीम, 30 जुलै 2021 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान आवास योजनेस गरिबांना आत्मविश्वास देणारी योजना म्हणून संबोधले आहे. ही केवळ घरे बांधण्याची योजना नाही, असे त्यांनी म्हटले आहे. या योजनेचे उद्दीष्ट हे आहे की गरीब लोक घर, वीज, पाणी, इंधन यासारख्या दैनंदिन संघर्षातून बाहेर पडून त्यांचे भविष्य आणि प्रगती यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

ते म्हणतात की, गरिबीतून मुक्त होण्याचा सर्वात मोठा मार्ग म्हणजे गरिबांना सक्षम बनविणे. आता या योजनेसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. उद्योग क्षेत्राची संघटना असलेल्या सीआयआयने सरकारकडे मागणी केली आहे की पंतप्रधान आवास योजना पुन्हा लॉंच करण्यात यावी आणि यामध्ये आयुर्विमा म्हणजे लाईफ इन्श्युरन्सची सुविधा बंधनकारक करण्यात यावी.

यासोबतच पंतप्रधान आवास योजनेमध्ये जे कर्ज मिळते त्यासाठीदेखील विमा देणे बंधनकारक करण्यात यावे. केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत देशातील सर्व लोकांचा घर देण्याची योजना बनवली आहे. या योजनेअंतर्गत कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास किंवा ती व्यक्ती अंपग झाल्यास त्याच्या कुटंबियांवर याचा भार पडू नये आणि त्याचे घराचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी सरकारने कर्जासोबत आयुर्विमा देण्याची मागणी सीआआयने केली आहे.

Advertisement

सीआयआयचे संचालक जनरल चंद्रजीत बॅनर्जी यांनी म्हटले आहे की पंतप्रधान आवास योजनेला पुन्हा लॉंच करण्याची आवश्यकता आहे. नव्याने ही योजना आणताना क्रेडिट लिंक्ड इन्श्युरन्स म्हणजेच या योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आयुर्विम्याचा लाभ दिला जाऊ शकतो. यामुळे सर्वांनाच घर मिळण्याच्या उद्दिष्टात अडचण येणार नाही.

या योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास किंवा अंपगत्व आल्यास घराशी निगडीत आर्थिक संकट उभे राहणार नाही. विपरित परिस्थितीत आयुर्विमा मोठी भूमिका बजावू शकतो. देशात वेगाने विकास व्हावा, यासाठी स्वस्तात घर पुरवली जाण्याची मोठी आवश्यकता आहे.

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत जर लाभार्थ्याचा मृत्यू झाला तर घर बनवण्याची प्रक्रिया किंवा स्वप्न अपूर्णच राहील आणि कर्जाच्या परतफेडीवर देखील परिणाम होईल. त्याच्या कुटुंबावर मोठेच संकट कोसळेल. या सर्व गोष्टी लक्षात घेता विमा आवश्यक आहे.

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker