कोरोनाने हैराण झालात ? स्वतःचा बिझनेस वाढवायचाय ? मोदी सरकार देईल 10 लाखांची मदत

MHLive24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :- कोरोना काळात अनेकांना आपला रोजगार गमावावा लागला, अनेकांची नोकरी गेली त्यामुळे बहुतेकांवर आर्थिक संकट ओढवलं. या कोरोना काळात अनेकजण आपला स्वत: चा व्यवसाय सुरू करू पाहत आहेत. परंतु पैशांची कमरता असल्याने हतबल झाले आहेत. अशा व्यक्तीसाठी मोदी सरकार योजनेच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे करत आहे.

देशातील असंघटित लघुउद्योगांच्या विकासाकरिता वित्तीय गरजा पूर्ण करण्यासाठी भारत सरकारने तयार केलेली पंतप्रधान मुद्रा योजना म्हणजेच मुद्रा बँक कर्ज योजना. भारतीय रोजगार क्षेत्रात मोठय़ा संख्येने सामावून घेतलेल्या लघुउद्योगांना या माध्यमातून आर्थिक साहाय्य पुरविणे हा यामागील उद्देश. ५० हजार रुपयांपासून १० लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळते.
तुमचा एखादा लघुद्योग असेल आणि तुमच्याकडे फक्त पार्टनरशिप डिड असेल तरीही पंतप्रधान मुद्रा योजनेतंर्गत तुम्हाला कर्ज दिले जाते.

कोणाला मिळते कर्ज? :- PMMY योजनेतंर्गत लहान व्यापारी आणि उद्योजकांना कर्ज मिळते. यामध्ये लहान कारखाने, दुकानदार, फळ किंवा भाजी विक्रेत, ट्रकचालक, रिपेअरिंगची दुकाने, लघुद्योग आणि फूड प्रोसेसिंग युनिट सुरु करण्यासाठी कर्ज मिळू शकते. प्रधानमंत्री मुद्रा योजनेतील (PMMY) कर्जासाठी सरकारी बँका, ग्रामीण बँका, खासगी बँकांमध्ये अर्ज केला जाऊ शकतो.

Advertisement

रिझर्व्ह बँकेने 27 सरकारी बँका, 17 खासगी बँका, 31 ग्रामीण बँका, 36 मायक्रोफायनान्स संस्था आणि 25 बिगरबँकिंग संस्थांना मुद्रा लोन वितरीत करण्याचा अधिकृत हक्क दिला आहे. mudra.org.in या संकेतस्थळावर तुम्हाला योजनेविषयी अधिक माहिती मिळू शकेल.

जाणून कशाप्रकारे मिळणार 10 लाख रुपये :- छोटासा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा आपले जुने काम वाढवण्यासाठी सरकारने दहा लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. पीएम मुद्रा लोन योजना असे सरकारच्या या योजनेचे नाव आहे.

मुद्रा कर्जावरील व्याज दर काय आहेत? :- पंतप्रधान मुद्रा योजनेंतर्गत कोणताही निश्चित व्याज दर नाही. मुद्रा कर्जासाठी बँका वेगवेगळे व्याज दर आकारू शकतात. साधारणत: किमान व्याज दर 12 टक्के असतो.

Advertisement

कर्जाचा फायदा आपण तीन चरणात घेऊ शकता :- तुम्हाला 3 चरणांमध्ये पंतप्रधान मुद्रा कर्जाचा लाभ मिळू शकेल. यातली पहिली पायरी म्हणजे शिशु लोन. याशिवाय दुसरा टप्पा किशोर कर्ज व तिसरा टप्पा तरुण लोनचा आहे.

1 शिशु कर्ज योजना- या योजनेंतर्गत तुम्हाला 50,000 रुपयांपर्यंत कर्ज मिळेल.
2. किशोर कर्ज योजना- या योजनेतील कर्जाची रक्कम 50,000 ते 5 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.
3. तरुण कर्ज योजना- तरुण कर्ज योजनेंतर्गत 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंतची कर्जे घेतली जाऊ शकतात.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker