अनिल अंबानी यांची आई कोकिलाबेनची कंपन्यांमध्ये आहे तब्बल ‘इतकी’ भागीदारी; पहा ‘इतक्या’ कोटींची आहे मालकीण

MHLive24 टीम, 30 जुलै 2021 :- अनिल धीरूभाई अंबानी समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी कदाचित पैशांच्या अधचणींशी झगडत असतील, पण त्यांच्या कंपन्या शेअर बाजारामध्ये चांगली कामगिरी करत आहेत. सध्या अनिल अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स ग्रुपच्या पाच कंपन्या शेअर बाजारावर सूचीबद्ध आहेत. यात रिलायन्स कॅपिटल, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, रिलायन्स कम्युनिकेशन, रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स होम फायनान्स यांचा समावेश आहे.

अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपच्या बहुतेक कंपन्यांचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. कंपन्या सतत तोट्यात चालत आहेत. अनेक कंपन्यांवर हजारो कोटींचे कर्ज आहे. अनिल अंबानी यांच्या कुटुंबाचा या कंपन्यांमध्ये हिस्सा आहे.

यात अनिल अंबानी, त्यांचे दोन पुत्र जय आणि अनमोल अंबानी, अनिल अंबानी यांची पत्नी टीना अंबानी आणि अनिल अंबानीची आई कोकिलाबेन धीरूभाई अंबानी यांचा समावेश आहे. आज आम्ही तुम्हाला अनिल अंबानींच्या कंपन्यांमध्ये त्यांची आई कोकिलाबेन अंबानी यांच्या भागभांडवल आणि मूल्याबद्दल सांगणार आहोत.
रिलायन्स पॉवर: सर्व प्रथम आपण अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवर लिमिटेड बद्दल बोलूया. कंपनी वीज निर्मिती आणि वीज वितरणाच्या व्यवसायात गुंतली आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसई वर उपलब्ध आकडेवारीनुसार, प्रवर्तक आणि प्रवर्तक गट या कंपनीमध्ये 9.06 टक्के भागधारक आहेत.

Advertisement

म्हणजेच प्रवर्तकांकडे या कंपनीचे 25,42,27,079 शेअर्स आहेत. यापैकी अनिल अंबानीची आई कोकिलाबेनकडे 9,16,461 शेअर्स आहेत. हे कंपनीच्या एकूण होल्डिंगच्या 0.3 टक्के इतके आहे. कोकिलाबेन अंबानीच्या भागभांडवलाचे मूल्य आजच्या 11.45 रुपये प्रति युनिटच्या भावाच्या आधारावर मोजले गेले तर ते 1.04 कोटी रुपयांच्या बरोबरीचे आहे.

रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड: रस्ते, महामार्ग आणि पोर्ट निर्माण संबंधित अनिल अंबानी यांच्या कंपनीत प्रमोटर आणि प्रवर्तक गटाची 4.98 टक्के हिस्सेदारी आहे. बीएसईच्या आकडेवारीनुसार, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे त्यांचे 1,30,13,424 शेअर्स आहेत. यातील अनिल अंबानीची आई कोकिलाबेनकडे 0.11 टक्के हिस्सा किंवा 2,74,937 शेअर्स आहेत.

आजच्या युनिटच्या 73.55  रुपये किंमतीनुसार, कोकिलाबेनच्या शेअर्सचे मूल्य सुमारे 2.02 कोटी आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या प्रवर्तक आणि प्रवर्तक गटामध्ये अनिलच्या कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त रिलायन्स बिग प्रायव्हेट लिमिटेड, रिलायन्स प्रोजेक्ट वेंचर्स अँड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि रिलायन्स इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड यांचा समावेश आहे.
 
रिलायन्स कम्युनिकेशनः अनिल आणि मुकेश अंबानी यांनी संयुक्तपणे सुरू केलेली रिलायन्स कम्युनिकेशन आता अनिल अंबानीसोबत आहे. एकेकाळी देशातील सर्वात लोकप्रिय टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेल्या रिलायन्स कम्युनिकेशनचा व्यवसाय जवळजवळ ठप्प झाला आहे. यामध्ये प्रवर्तक आणि प्रवर्तक गटाचा हिस्सा 5.18 टक्के आहे. हे 14,31,16,572 शेअर्सच्या बरोबरीचे आहे.

Advertisement

अनिल अंबानी यांची आई कोकिलाबेन यांच्याकडे रिलायन्स कम्युनिकेशनचे 46,65,847 शेअर्स आहेत. ही कंपनीची एकूण 0.17 टक्के हिस्सेदारी आहे. आजचे शेअर प्राईस  3.02 प्रति युनिट दराने   कोकिलाबेनच्या शेअर्सची किंमत  1.40  कोटी आहे.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker