जयंत पाटील यांची उद्या अँजिओग्राफी

MHLive24 टीम, 29 जुलै 2021 :- मंत्रिमंडळाच्या बैठकीत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ते बैठक अर्धवट सोडून निघून गेले. त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उद्या त्यांची अँजिओग्राफी करण्यात येणार आहे.

ईसीजीमध्ये फरक :- मंत्रिमंडळ बैठक अर्धवट सोडून पाटील रुग्णालयाकडे रवाना झाले होते. पाटील यांची प्रकृती स्थित असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. त्यांच्या ईसीजी रिपोर्टमध्ये काही फरक जाणवला आहे. अन्य सर्व रिपोर्ट नॉर्मल असल्याचं टोपे यांनी सांगितलं.

प्रकृती स्थिर :- पाटील यांना मंत्रिमंडळ बैठकीत थोडी अस्वस्थता जाणवत होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना त्वरीत रुग्णालयात नेण्यास सांगितलं. आम्ही तातडीनं रुग्णालयात पोहोचलो. जयंत पाटील यांची प्रकृती चांगली आहे. ईसीजीमध्ये काही बदल जाणवतो आहे. 2 डी इको, बल्ड टेस्टही नॉर्मल आहे, असे टोपे यांनी सांगितलं.

Advertisement

जयंत पाटील यांचे ट्वीट :- दरम्यान, रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर जयंत पाटील यांनी ट्वीट करून आपली प्रकृती चांगली असल्याची माहिती दिली आहे. तसंच अफवांवर विश्वास ठेवू नका असंही ते म्हणाले. ‘आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माझी प्रकृती अत्यंत उत्तम आहे. काळजी करण्याचे कारण नाही.

नियमित तपासणीसाठी मी रुग्णालयात गेलो होतो. डॉक्टरांनी मला विश्रांती घेण्याची सूचना केली आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. मी लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईल. धन्यवाद!’, असं ट्वीट पाटील यांनी केलं आहे.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker