जुन्या नोटा आणि नाण्यांसंदर्भात रिझर्व्ह बँकेकडून अलर्ट जारी, वाच अन सावध व्हा

MHLive24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :- अनेकांना वेगवेगळे छंद असतात. यातलाच एक म्हणजे जुनी नाणी आणि नोटा जमावण्याचा. तुमच्याकडे असलेल्या या जुन्या नाणी, नोटा विकून लखपती व्हा अशा अनेक ऑफर्स तुम्ही सर्रास बघत असाल. तुमच्या या छंदाचा फायदा घेत अनेक जण आपल्याजवळील जुन्या नोटा आणि नाणी सर्वाधिक किंमतींना विकतात.

सोशल मीडियावर तर अशा अनेक जाहिराती हमखास दिसत असतात. मात्र अशा जुन्या नोटा- नाणी खरेदी विक्रीच्या अमिषाला बळी पडू नका असे आवाहन आता भारतीय रिझर्व्ह बँक (RBI)ने केलं आहे. यासंदर्भातील भारतीय रिझर्व्ह बँकेने एक नोटीस जाहीर केली आहे.

अशा जाळ्यात सामान्यांनी अडकू नये :- खरं तर काही घटक आरबीआयच्या नावाने सामान्य लोकांकडून वेगवेगळ्या ऑनलाईन आणि ऑफलाईन माध्यमांतून फसवणुकीद्वारे जुन्या नोटा आणि नाण्यांच्या खरेदी आणि विक्रीशी संबंधित व्यवहारांमध्ये शुल्क किंवा कमिशनची मागणी करत आहेत. अशा जाळ्यात सामान्यांनी अडकू नये, असे आरबीआयने स्पष्ट केलेय.

Advertisement

काय म्हणाली आरबीआय ? :- आरबीआय जुन्या नोटा किंवा नाणी विकण्यासारख्या कोणत्याही व्यवहारात सामील नाही आणि कोणत्याही प्रकारचे कमिशन किंवा पैसे घेत नाही. केंद्रीय बँकेने एका ट्विटद्वारे सांगितले आहे की, आरबीआयच्या कोणत्याही सदस्याला, कर्मचाऱ्याला किंवा कंपनीला किंवा संस्थेला अशा व्यवहारांसाठी अधिकार देण्यात आलेले नाहीत.

भारतीय रिझर्व्ह बँक सामान्य लोकांना अशा बनावट आणि फसव्या ऑफरच्या जाळ्यात न पडण्याचा सल्ला दिलाय. यापूर्वीही वेळोवेळी आरबीआय ग्राहकांना अशा फसवणूक टाळण्यासाठी अलर्ट जारी केलाय.

काय आहे आवाहन ? :- तुमच्याकडे असलेल्या या जुन्या नाणी, नोटा विकून लखपती व्हा अशा अनेक ऑफर्स सोशल मिडियावर दिसून येतात. काही ठिकाणी नाण्याचे छायाचित्र दोन्ही बाजूंनी अपलोड करून त्यानंतर लोक या नाण्यावर बोली लावतात, जो व्यक्ती जास्त पैसे देईल, त्याला तुम्ही हे नाणे विकू शकता असंही काही ठिकाणी करून फसवणूक केली जात आहे.मात्र अशा जुन्या नोटा- नाणी खरेदी विक्रीच्या अमिषाला बळी पडू नका असे आवाहन आता भारतीय रिझर्व्ह बँक (RBI)ने केलं आहे. यासंदर्भातील भारतीय रिझर्व्ह बँकेने एक नोटीस जाहीर केली आहे.

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker