अमोल कोल्हे म्हणतात, ‘ठाकरे यांनी राष्ट्राचं नेतृत्व केलं, तर अभिमान; पण..!’

MHLive24 टीम, 29 जुलै 2021 :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी, ‘उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय नेतृत्व करावं,’ असे म्हटले होते. त्यांच्या या शुभेच्छांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आपलं मत व्यक्त केलं.

“मला अभिमान असेल; पण सगळ्या विरोधी पक्षांची भूमिका आणि राष्ट्रवादी काँग्रेससह पक्षेश्रष्ठींची भूमिका काय असेल हे माहिती नाही. ती महत्त्वाची असेल,”असं ते म्हणाले.

राऊतांच्या वक्तव्याबाबत आशावादी :- राऊत यांनी जे वक्तव्य केलं, त्याबद्दल आशावादी असायला काहीच हरकत नाही. कोणतीही मराठी व्यक्ती पंतप्रधानपदी बसली तर प्रत्येक मराठी माणसाला त्याचा अभिमानच असेल, आनंदच होईल, असं ते म्हणाले. ठाकरे यांच्या नेतृत्वात मला कायम सुसंस्कृतपणा आणि संयमीपणा दिसला आहे, असंही कोल्हे म्हणाले.

Advertisement

काय म्हणाले कोल्हे ? 

विरोधकांचा चेहरा कोण हा मुद्दा गौण :- देशाच्या दृष्टीने आता विरोधकांचा चेहरा कोण हा मुद्दा गौण ठरतो आहे आणि सरकारच्या या एक कलमी कार्यक्रमाला चाप बसवणं गरजेचे आहे. अशा काळात विरोधी पक्षाने एकत्र येणे हे आशादायी चित्र आहे, असंही खासदार कोल्हे म्हणाले.

सरकारने चर्चेपासून पळ काढू नये :- सरकार संसदेत चर्चेतून पळ काढताना दिसत आहे. संसदेची कार्यवाही चालवणं हे सत्ताधारी पक्षाचं काम आहे. कामकाज सुरू होण्याची नितांत आवश्यकता आहे; पण ही जबाबदारी सत्ताधाऱ्यांची आहे. चर्चेला जर सत्ताधारी तयार झाले तर अनेक प्रश्नांवर सांगोपांग चर्चा होईल. सरकार जर चर्चेतून पळ काढत असेल तर जनतेचे प्रश्न मांडताना अडचणी येतील, असं ते म्हणाले.

Advertisement

जनतेच्या मुद्द्यांवर व्हावी चर्चा :- पेगॅसस, कोविडची तिसरी लाट, प्रचंड वाढलेली महागाई, कृषी कायदे या विषयांवर संसदेत चर्चा झालीच पाहिजे. सरकार म्हणत असेल, की सभागृहात काम रेटून नेऊ; पण आमचा याला जोरदार विरोध असेल, असा पवित्रा कोल्हे यांनी घेतला.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker