Ambani-Adani : अंबानी-अदानींनी स्वतःसोबत लोकांनाही केले मालामाल; ज्यांनी 10 लाख गुंतवले त्यांना मिळाले 1.7 कोटी

MHLive24 टीम, 15 डिसेंबर 2021 :- देशातील दोन सर्वात मोठे श्रीमंत व्यक्ती अर्थात मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या कंपन्यांनी गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस पाडला आहे.(Ambani-Adani)

हे दोघे श्रीमंतांच्या यादीतील अव्वल व्यक्तिमत्व हायेत. परंतु त्यांनी त्यांच्या सोबतच गुंतवणूकदारांनादेखील मालामाल केले आहे.

मोतीलाल ओसवाल यांच्या 26 व्या वार्षिक संपत्ती निर्मिती अभ्यासानुसार, रिलायन्स इंडस्ट्रीज सर्वात मोठी संपत्ती निर्माण करणारी कंपनी म्हणून उदयास आली आहे.

Advertisement

त्याचप्रमाणे अदानी ट्रान्समिशन ही सर्वात जलद गुंतवणूकदार मालामाल केले आहेत. तर अदानी एंटरप्रायझेसने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे.

या अभ्यासानुसार, देशातील सर्वात मूल्यवान कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज ही सलग तिसऱ्यांदा सर्वात मोठी संपत्ती निर्माण करणारी कंपनी ठरली आहे. 2016 ते 2021 या कालावधीत या कंपनीने 9.7 लाख कोटी रुपयांची संपत्ती उभारली. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विक्रम आहे. या प्रकरणी कंपनीने स्वतःचाच विक्रम मोडला आहे.

यापूर्वी, कंपनीने 2014 ते 2019 दरम्यान 5.6 लाख कोटी रुपयांची कमाई केली होती. या कालावधीत, कंपनीच्या नफ्यात वार्षिक 8 टक्क्यांनी वाढ झाली तर शेअरची किंमत चक्रवाढ वार्षिक 31 टक्क्यांनी वाढली. या काळात सर्वाधिक संपत्ती निर्माण करणाऱ्या कंपन्यांच्या यादीत TCS, HDFC बँक आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांचा समावेश करण्यात आला.

Advertisement

10 लाखांचे बनवले 1.7 कोटी रुपये

2016 ते 2021 दरम्यान सर्वात जलद संपत्ती निर्माण करणाऱ्या कंपन्यांच्या यादीत अदानी ट्रान्समिशन अव्वल स्थानावर आहे. या कंपनीने 93% चक्रवाढ वार्षिक दराने संपत्ती निर्माण केली आहे. या प्रकरणात, दुसरा क्रमांक दीपक नायट्रेटचा आहे, ज्याने गुंतवणूकदारांसाठी 90 टक्के वार्षिक चक्रवाढ दर मिळवला आहे.

अदानी एंटरप्रायझेसने वर्षभरात 86 टक्के कमाई केली आहे आणि तन्ला प्लॅटफॉर्मने वार्षिक 85 टक्के कमाई केली आहे. 2016 मध्ये जर तुम्ही देशातील टॉप 10 सर्वात वेगवान संपत्ती निर्माण करणाऱ्या कंपन्यांमध्ये 10 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आज ती 1.7 कोटी रुपये झाली असती. या कंपन्यांनी वार्षिक सरासरी 77 टक्के परतावा दिला आहे. या काळात सेन्सेक्सचा वार्षिक दर 14 टक्के होता.

Advertisement

दरम्यान, अदानी एंटरप्रायझेस सर्वात सातत्यपूर्ण आणि सर्वांगीण संपत्ती निर्माण करणारा म्हणून उदयास आला आहे. मोतीलाल ओसवाल यांच्या अभ्यासानुसार, 2016 ते 2021 दरम्यान, या कंपनीच्या स्टॉकने गेली सलग 5 वर्षे चांगली कामगिरी केली आहे आणि 86 टक्के CAGR वर परतावा दिला आहे. तसेच या स्टॉकने सर्व कॅटेगिरीनमध्ये अष्टपैलू कामगिरी केली आहे.

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker