Amazon’s users data: सावधान! Amazon कडे आहे तुमची सर्व गुप्त माहिती; तुम्ही रोज काय करता? काय ऐकता? इथपासून तर अगदी सर्व माहिती..का अन कशी गोळा केली होते ही माहिती ? वाचा…

MHLive24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :- सध्या ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon खूपच लोकप्रिय आहे. सध्या अनेक लोक यावरूनच खरेदी करण्यावर जोर देत आहेत. परंतु तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल की, Amazon जवळ तुमचा बराचसा खाजगी डेटा आहे.(Amazon’s users data)

अलीकडेच असे समोर आले आहे की अॅमेझॉन आपल्या वापरकर्त्यांचा भरपूर डेटा सेव्ह ठेवते.चालयाबद्दल अधिक तपशीलवार जाणून घेऊयात 

अॅमेझॉनशी संबंधित हा खुलासा आश्चर्यचकित करेल

Advertisement

अलीकडेच, अमेरिकेतील व्हर्जिनिया येथील खासदार इब्राहिम समीरा यांना हे समजले आहे की अॅमेझॉन त्यांची खाजगी माहिती संग्रहित करते आणि त्यांच्या संपर्कांपासून ते त्यांच्या दैनंदिन कामांपर्यंत सर्व काही अॅमेझॉनकडे आहे. याच कारणामुळे समीराने याप्रकरणी अॅमेझॉनला विरोधही केला आहे.

Amazon कडे तुमच्यासंदर्भात ही माहिती आहे

समीरा यांनी अॅमेझॉनला विचारले की अॅमेझॉनकडे तिच्यासंदर्भात कोणती माहिती आहे आणि तिच्यासोबत रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या सात पत्रकारांनीही त्यांची माहिती विचारली.

Advertisement

या सर्वांवरून असे दिसून आले की अलेक्सा तसेच किंडल सारख्या विविध डिवाइसेज मधून आपला डेटा गोळा केला जात आहे. तुम्ही कोणाला भेटता, कोणती गाणी ऐकता, कोणते चित्रपट पाहता, तुम्हाला काय आवडते आणि काय आवडत नाही, हे सर्व Amazon कडे आहे.

ऍमेझॉन हे का करते?

जेव्हा अॅमेझॉनला विचारण्यात आले की ते त्यांच्या ग्राहकांची वैयक्तिक माहिती का साठवून ठेवतात, तेव्हा ते म्हणाले की ते त्यांच्या वापरकर्त्यांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी हे करतात. Amazon च्या मते, अशी माहिती पूर्णपणे सुरक्षित ठेवली जाते आणि वापरकर्त्यांचा डेटा पूर्णपणे सुरक्षित असतो.

Advertisement

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker