दिवाळीपूर्वी खुशखबर; बदाम आणि काजूच्या किमतीत तब्बल ‘इतकी’ घसरण

MHLive24 टीम, 26 ऑक्टोबर 2021 :- एकीकडे महागाई वाढत चालली आहे. पेट्रोल डिझेल गगनाला भिडले आहे. त्यामुळे इतर सर्वगोष्टी महागल्या आहेत. परंतु आता यातच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.(Almond and cashew prices)

दिवाळीच्या तोंडावर देशातील घाऊक बाजारपेठेत काजू, बदाम, मनुक्यासह सुकामेव्याच्या दरात लक्षणीय घट झाली आहे. दिवाळीच्या सणाला सुकामेव्याला प्रचंड मागणी असते.

मात्र, गेल्या काही महिन्यांत सुकामेव्याचे दर प्रचंड वाढले होते. बदामाचा प्रतिकिलो भाव 1200 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला होता. परंतु, घाऊक बाजारपेठेत आता हा दर 600 रुपयांपर्यंत खाली उतरला आहे.

Advertisement

देशातील सर्वात मोठी सुका मेवा बाजारपेठ असलेल्या खारी बाओली येथील व्यापारी रवि बत्रा म्हणाले की, अफगाणिस्तानमधील परिस्थितीमुळे खरंतर सुका मेवाच्या किमतीत अपेक्षेहून अधिक वाढ झाली होती. त्यामुळेच आता दर वेगानं घसरत आहेत. येत्या काही काळात नव्या उत्पादनानं किमतीत आणखी दबाव निर्माण होईल.

सुका मेव्याचे नवे दर

खारी बाओली रोडमधील सुका मेवा व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बदामाचे दर 1100 रुपयांवरुन थेट 680 रुपये किलोवर आले आहेत. तर कॅलिफोर्नियाच्या बदमाची किंमत 1120 रुपये प्रतिकिलोहून घसरुन 660 रुपये इतकी झाली आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियातील बदामाची किंमत 1140 रुपयांनी घसरुन 680 रुपये प्रतिकिलो झाली आहे.

Advertisement

तर ईराण येथील बदाम राज की किंमतही घसरली आहे. अफगाणिस्तानातून येणारे बदाम 1190 रुपयांहून खाली घसरुन 600 ते 700 रुपये प्रतिकिलो इतके झाले आहेत. तर काजूचे दर 1 हजार रुपयांनी घसरुन 800 रुपये प्रतिकिलो इतके झाले आहेत. अक्रोड 1000 रुपयांवरुन 800 रुपये प्रतिकिलो इतके झाले आहेत.

मागील दिवाळीत काय परिस्थिती होती ?

गेल्या दिवाळीतही सुकामेव्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली होती. त्यावेळी काजू 450 रुपये प्रतिकिलो दराने विकला जात होता. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अवघ्या दहा दिवसांमध्ये तब्बल 3700 टन सुकामेव्याची विक्री झाली होती. यामध्ये बदामची विक्री 1480 टन इतकी होती. त्यामुळे अवघ्या दहा दिवसांमध्ये सुकामेव्याच्या विक्रीतून जवळपास 140 कोटींची उलाढाल झाली होती.

Advertisement

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker